Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुढच्या वर्षी लवकर या… श्रेया बुगडेनं लाडक्या बाप्पाला दिला निरोप, घरीच केलं विसर्जन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 14:55 IST

श्रेयाने सोशल मिडीयावर बाप्पाला निरोप देतानाची भावुक पोस्ट शेअर केलीय.

गणेश चतुर्थी हा सण दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यानिमित्ताने चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आपल्या घरी गणपती बसवतात. यावर्षीही अनेक कलाकारांनी आपल्या घरी गणपती बाप्पाचं थाटात स्वागत केलं. कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेनेही आपल्या घरी गणपती बाप्पाची स्थापना केली होती. पण, जेव्हा गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ तेव्हा श्रेया भावूक झाल्याचा पाहायला मिळालं. 

श्रेया बुगडेने  घरीच बाप्पाचं विसर्जन केलं आहे. श्रेयाने सोशल मिडीयावर बाप्पाला निरोप देतानाची भावुक पोस्ट शेअर केलीय. श्रेयाने या पोस्टमध्ये म्हटलं, "सांभाळून जा. ... सोबत दिलेला खाऊ भूक लागली कि नक्की खा. ... खूप लोकांनी त्यांची bucket list तुला सांगितली असेल त्यामुळे वर्षभर तू खूप व्यस्त अशील हे माहित आहे मला त्यालामुळे मी तुला खूप त्रास नाही देणार.... एकच सांगेन माझ्यावर जे नितांत प्रेम करून जीव टाकतात त्या सगळ्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य दे आणि इतरांनाही आणि हे सगळं करताना मात्र स्वतःला जप... ये लौकर पुढच्या वर्षी...तुला खूप प्रेम".

श्रेयाच्या या पोस्टवर तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी यावर 'फारच गोड', 'खूपच सुंदर ताई गणपती बाप्पा मोरया' अशा कमेंट केल्याचे पाहायला मिळत आहे. श्रेया बुगडेच्या घरी दरवर्षी पाच दिवस गणपती बाप्पा विराजमान होतो.

 श्रेया बुगडे ही 'चला हवा येऊ द्या' या शोमुळे श्रेया घराघरात पोहोचली. श्रेयाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. पण, चला हवा येऊ द्यामुळे तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. सध्या ती 'ड्रामा ज्युनियर्स' या रिएलिटी शोचं सूत्रसंचालन करत आहे. झी मराठी वाहिनीवरील 'तू तिथे मी' या मालिकेत श्रेया दिसली होती. या मालिकेत तिने सोशिक पत्नी असलेल्या स्त्रीची भूमिका साकारली होती.

टॅग्स :श्रेया बुगडेसेलिब्रिटी गणेशगणेशोत्सव 2024