Join us

शिवानी सोनारने घरी आणली Tata कंपनीची नवी कोरी कार, गाडीची किंमत माहितीये?

By कोमल खांबे | Updated: July 30, 2025 09:12 IST

एका मराठी अभिनेत्रीने नवी कोरी कार घरी आणली आहे. कारसोबतचे फोटो शेअर करत अभिनेत्रीने याची माहिती चाहत्यांना दिली आहे.

सेलिब्रिटी त्याच्या लाइफमधील अपडेट्स चाहत्यांना देत असतात. नवीन कार, नवं घर किंवा नव्या प्रोजेक्टची माहिती चाहत्यांसोबत शेअर करायला सेलिब्रिटींनाही आवडते. नुकतंच एका मराठी अभिनेत्रीने नवी कोरी कार घरी आणली आहे. कारसोबतचे फोटो शेअर करत अभिनेत्रीने याची माहिती चाहत्यांना दिली आहे. ही अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून शिवानी सोनार आहे. 

शिवानीने टाटा कंपनीची Tata Altroz ही गाडी खरेदी केली आहे. कुटुंबीयांसोबत शिवानी तिची ही नवी कोरी कार खरेदी करण्यासाठी गेली होती. गाडीचे फोटो शेअर करत शिवानीने "My OG “TARINI” is here", असं कॅप्शन दिलं आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी शिवानीचं अभिनंदन करत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. शिवानीने घेतलेली टाटा कंपनीची गाडी हे Tata Altroz या कारचं नवीन मॉडेल आहे. याची किंमत सुमारे ६ ते १० लाखांच्या घरात आहे. 

दरम्यान, शिवानीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'राजा राणीची गं जोडी' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. त्यानंतर 'सिंधुताई माझी माय', 'तू भेटशी नव्याने' या मालिकांमध्ये दिसली. आता शिवानी 'तारिणी' या झी मराठी वाहिनीवरील मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारटाटाकार