Join us
Daily Top 2Weekly Top 5

अरे संसार संसार! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने गावाकडच्या चुलीवर भाजल्या भाकऱ्या, व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 11:02 IST

अभिनेत्रीने शेअर केलेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये ती भाकऱ्या थापताना दिसते आहे, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती ती चुलीवर भाकरी करताना दिसतेय.

झी मराठीवरील माझी तुझी रेशमीगाठ या लोकप्रिय मालिकेने काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. यात मालिकेतील यश, नेहा आणि परी इतकीच सिम्मी काकूची भूमिकाही गाजली होती. मालिकेत सतत आपलं स्टेट्स संभाळणारी सिम्मी काकू चक्क चुलीवर भाकरी बनवते आहे, हे सांगितलं तर कोणाला तरी खरं वाटेल का?, सिम्मी काकूची भूमिका साकारणाऱ्या शीतल क्षीरसागरने चुलीवर भाकरी बवनल्या आहेत.  

चुली शेजारी बसून भाकऱ्या बवनण्याचा शीतलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. शीतलने अलीकडेच तिने कोकणातील गावी घेतलेला चुलीवरची भाकरी भाजण्याचा अनुभव सर्वांसोबत शेअर केला. अभिनेत्रीने शेअर केलेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये ती भाकऱ्या थापताना दिसते आहे, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती ती चुलीवर भाकरी करताना दिसतेय. भाकरी भाजून झाल्यानंतर शीतलने कौतुकाने व्हिडिओमध्ये तिने भाजलेली भाकरी दाखवली. 

या पोस्टला तिने “चुलीवरची तांदळाची भाकरी…जाणकारांच्या सानिध्यात तुम्ही असलात की सगळं काही शक्य आहे,” असं कॅप्शन दिलं आहे. शीतलचा हा व्हिडीओ चाहत्यांचाही पसंतीस उतरला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

 शीतल ही छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. यापूर्वी ती 'का रे दुरावा' या लोकप्रिय मालिकेत देखील दिसली होती. या मालिकेतील शोभाच्या भूमिकेने त्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली..शीतल क्षीरसागर या मागील 20 वर्षापासून मराठी मनोरंजन क्षेत्रात काम करत आहेत. त्यांच्या वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकेचे त्यांनी सोने केले आहे. मग ती भूमिका नकारत्मक असो की सकारात्मक. सध्या शीतल 'रमा राघव' या कलर्स मराठीवरील मालिकेत लावण्या परांजपे ही भूमिका साकारत आहे. या मालिकेतही तिची नकारात्मक भूमिका आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकार