Join us

अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 16:18 IST

अभिनेत्रीचा पती सध्या लोकप्रिय मालिकेत काम करत आहे.

गेल्या काही वर्षात मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांनी गुडन्यूज दिली आहे. कुंडली भाग्य फेम अभिनेत्री श्रद्धा आर्याने ६ महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म दिला. तर आता 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता रोहित पुरोहित (Rohit Purohit) बाबा होणार आहे. पत्नी शीना बजाजने (Sheena Bajaj) लग्नानंतर ६ वर्षांनी गुडन्यूज दिली आहे. कपलने व्हिडिओ शेअर करत चाहत्यांसोबत ही बातमी शेअर केली. त्यांच्यावर चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.  

रोहित आणि शीना बजाजने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. अबोली रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये शीनाने बेबी बंप फ्लॉन्ट केला आहे. आई बाबा होणार असल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय. काही महिन्यात शीना पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. "तुमच्या प्रार्थनेची आणि आशिर्वादाची आम्हाला गरज आहे. मी धैर्याने आणि ताकदीने आयुष्यातील या नवीन चॅप्टरला सामोरी जाईन अशी देवाकडे प्रार्थना. आमचा हा प्रवास सुरळीत होवो. माझ्या चाहत्यांसोबत आज मी ही सर्वात मोठी गोष्ट शेअर करत आहे." असं कॅप्शन तिने लिहिलं आहे. 

शीना आणि रोहित यांची लव्हस्टोरी २०१४ साली 'अर्जुन' या शोच्या सेटवरुन सुरु झाली. आधी त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर ते प्रेमात पडले. शो संपल्यानंतर शीनानेच रोहितला प्रपोज केलं होतं. २०१९ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. 

शीना बजाजही अभिनेत्री आहे. 'बेस्ट ऑफ लक निक्की' ही तिची मालिका खूप गाजली होती. ५ वर्ष ही मालिका चालली होती. याशिवाय तिने 'हमसे है लाईफ', 'मरियम खान रिपोर्टिंग लाईव्ह', 'थपकी प्यार की' या मालिकांमध्येही काम केलं आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारप्रेग्नंसी