Join us
Daily Top 2Weekly Top 5

"विमानात बिघाड, मनात भीती आणि अहमदाबादला अचानक.."; अभिनेत्रीने सांगितला थरारक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 13:27 IST

प्रसिद्ध अभिनेत्रीने विमानप्रवासाचा थरारक अनुभव सांगितला आहे. त्यामुळे चाहत्यांना अभिनेत्रीची चांगलीच काळजी वाटली आहे

अहमदाबादविमान दुर्घटनेमुळे अनेकांनी विमान प्रवासाचा जणू धसकाच घेतला आहे. अशातच एका अभिनेत्रीने नुकताच घडलेला विमान प्रवासाचा थरारक अनुभव सर्वांसोबत शेअर केला आहे. ‘बिग बॉस OTT’ फेम अभिनेत्री सना मकबुलसोबत ही घटना घडली. सना नुकतीच जोधपूरहून मुंबईला येत असताना तिच्या इंडिगो विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे विमानाची इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. ही घटना अहमदाबादमध्ये घडली. सना मकबुलने स्वतः सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे.

सनाने सांगितला थरारक घटनाक्रम

सना म्हणाली की, "प्रवासादरम्यान अचानक काहीतरी अडचण निर्माण झाली. विमानात काहीतरी गडबड वाटत होती. थोड्याच वेळात आम्हाला कळलं की विमानात तांत्रिक बिघाड झाला आहे आणि ते अहमदाबादला उतरवण्यात येणार आहे. खरं सांगायचं तर खूप भीती वाटत होती. पण पायलटने अतिशय हुशारीने आणि वेळेवर योग्य निर्णय घेतला आणि आम्हाला सुरक्षित लँड केलं."

सना पुढे म्हणाली की, "काही वेळ विमानातच थांबावं लागलं आणि नंतर दुसऱ्या विमानाने मला मुंबईला आणण्यात आलं. हे सगळं खूप धक्कादायक होतं. मात्र मी सुखरूप आहे, याचंच समाधान आहे." सना मकबुलने इंडिगो एअरलाईन्स आणि पायलटचे आभार मानले आहेत. तिच्या या पोस्टनंतर अनेक चाहत्यांनी तिची काळजी घेतली आणि तिच्या सुरक्षिततेबद्दल समाधान व्यक्त केलं. अशाप्रकारे सना मकबुलने घडलेला सर्व घटनाक्रम सांगितला आहे. 

सना मकबुलला झालाय गंभीर आजार

सना मकबुलला गेल्या काही दिवसांपासून ऑटोइम्यून हेपेटायटिस या आजाराचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सनाची तब्येत खराब होत आहे. सनाच्या इम्युन सिस्टिमने लिव्हरवर परिणाम करणं सुरू केलं आहे. नुकतंच तिला लिव्हर सिरोसिस झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या कठीण काळातही ती खंबीर राहण्याचा प्रयत्न करत आहे. लिव्हर ट्रान्सप्लांट करावं लागू नये यासाठी डॉक्टर आणि ती प्रयत्न करत आहोत. सनाची काही दिवसांपूर्वी इम्यूनोथेरेपीही सुरू झाली आहे. फक्त लिव्हर ट्रान्सप्लांट स्टेजला हा आजार जाऊ नये, हीच तिची इच्छा आहे. 

टॅग्स :बिग बॉसविमानतळविमानइंडिगोअहमदाबाद