Join us
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनच्या काळात ही अभिनेत्री करतेय चुलीवर जेवण, पाहा हा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 18:30 IST

लॉकडाऊन सुरू होण्याआधी ही अभिनेत्री तिच्या गावी गेली होती. लॉकडाऊनची घोषणा झाल्यामुळे ती सध्या तिथेच राहात आहे.

ठळक मुद्देरतनने सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला असून या व्हिडिओत ती चक्क चुलीवर जेवण बनवताना दिसत आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. सगळेच लोक आपआपल्या घरात कैद आहेत. केवळ सर्वसामान्यच नाहीत तर सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. बॉलिवूड व टीव्हीचे स्टार्स वेगवेगळ्या पद्धतीने वेळ घरात वेळ घालवत आहेत. पण टीव्ही अभिनेत्री रतन राजपूत हिची स्थिती सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. होय, रतन एका गावात अडकून पडलीय. अशा गावात, जिथे ना टीव्ही आहे, ना आंघोळीसाठी बाथरूम. एवढेच नव्हे तर या गावात गॅस, स्टोव्ह नसल्याने चक्क तिला चुलीवर जेवण बनवावे लागत आहे.

रतन लॉकडाऊन सुरू होण्याआधी तिच्या गावी गेली होती. लॉकडाऊनची घोषणा झाली आणि ती गावातच अडकून पडली. आता ती लॉकडाऊनच्या काळातील अनुभव सोशल मीडियावर शेअर करत आहे. तिने सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला असून या व्हिडिओत ती चक्क चुलीवर जेवण बनवताना दिसत आहे. रतनने चण्याची भाजी आणि भात चुलीवर बनवला असून तिने शेअर केलेल्या व्हिडिओत पदार्थांची रेसिपी आणि पदार्थ बनवतानाचा तिचा अनुभव देखील सांगताना दिसत आहे.

अगले जन्म मुझे बिटीया ही किजो, महाभारत, संतोषी माँ यांसारख्या मालिकेत रतन रजपूतने मुख्य भूमिका साकारल्या आहेत. बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शो मध्ये देखील ती झळकली होती. रतन सोशल मीडियावर सध्या चांगलीच सक्रिय असून तिचे हे गावातील व्हिडिओ, फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत.

टॅग्स :टेलिव्हिजन