Join us
Daily Top 2Weekly Top 5

आज महिन्याला लाखो कमावणाऱ्या अभिनेत्री रश्मी देसाईचा पहिला पगार ऐकून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 15:24 IST

अलीकडेच अभिनेत्री रश्मी देसाई (Rashami Desai)ने तिच्या स्ट्रगलच्या दिवसांच्या आठवणीत काही गोष्टी शेअर केल्या आहेत.

अभिनेत्री रश्मी देसाई(Actress Rashami Desai) ला कोणत्याही ओळखीची गरज नाही. आत्तापर्यंत तिने अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र, आज ती ज्या स्थानावर आहेत, त्यासाठी तिने खूप मेहनत घेतली आहे. आज भले ही ती लाखात कमावते, पण एक वेळ अशी आली की तिच्याकडे 300 रुपयेही नव्हते.

खरं तर, अलीकडेच अभिनेत्री रश्मी देसाई (Rashami Desai)ने तिच्या स्ट्रगलच्या दिवसांच्या आठवणीत काही गोष्टी शेअर केल्या आहेत. यादरम्यान तिने आपला पहिला पगार (Actress First Salary)ही सांगितला.

ती म्हणाला, 'मी माझ्या करिअरला लहान वयात सुरुवात केली कारण माझ्याकडे पर्याय नव्हता.. मला असे वाटते की मी एका गोष्टीपासून दुसर्‍या गोष्टीकडे बराच काळ धावत राहिले. मी सर्व काही करण्याचा प्रयत्न करत आहे. मला आनंद आहे की आता स्थैर्य आहे आणि मला चांगले काम करायचे आहे. अभिनेत्री म्हणून माझी स्वप्ने अजून पूर्ण व्हायची आहेत, त्या दिशेने मी काम करत आहे. मला माहित आहे की ती मला मिळेल जी खूप सुंदर भावना आहे.

रश्मी देसाईचा पहिला पगार 350 रुपये होता. तिने 2004 मध्ये 'ये लम्हे जुदाई के' (Ye Lamhe Judayi Ke) मधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 'उतरन' (Uttran)  या मालिकेतून तिने टीव्हीच्या दुनियेत एंट्री घेतली. यानंतर ती 'दिल से दिल तक' या टीव्ही शोमध्ये दिसली, ज्यामध्ये तिची सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) सोबतची जोडी खूप आवडली होती.

टॅग्स :रश्मी देसाईटिव्ही कलाकार