Join us
Daily Top 2Weekly Top 5

Prajakta Mali : ' बघून फार बरं वाटलं.....', प्राजक्ता माळीची 'ती' पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 08:00 IST

Prajakta Mali :तरूणांची क्रश असलेली मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. प्राजक्ताच्या पोस्टवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होता.

तरूणांची क्रश असलेली मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali ) सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. प्राजक्ताच्या पोस्टवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होता. प्राजूने एखादी पोस्ट केली रे केली की ती क्षणात व्हायरल होते. प्राजक्ता सोशल मीडियावर रोज नवे फोटो शेअर करत असते. प्राजक्ता माळी नुकत्याच एका अरंगेत्रम कार्यक्रमाला पाहुणी म्हणून गेली होती. तिथलं काही निवडक फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

प्राजक्ताची पोस्ट परवा एका “अरंगेत्रम्” ला प्रमुख पाहुणी म्हणून जाण्याचा योग आला…खूप दिवसांनंतर सबंध ‘मार्गम् ‘ बघून फार बरं वाटलं.तसा हा घरचाच कार्यक्रम होता…माझ्या गुरू श्रीमती स्वाती ताईची शिष्या सौ. ऋजूता जोग - माझी गुरूभगिनी, तिची शिष्या कु. आस्था वैद्य जणू बहीण… आणि मैथिली कुलकर्णी यांचं अरंगेत्रम् होतं. दोघींनी सुरेख नर्तन केलं.भारतीय नृत्य परंपरा पुढची पिढी पण जोपासतेय, बघून आनंद वाटतो… 

प्राजक्ताला देखील लहानपणापासून नृत्याची आवड होती. म्हणून वयाच्या 6व्या वर्षी तिने भरतनाट्यम शिकण्यास सुरुवात केली होती. इतकेच नव्हे तर जेव्हा ती 13 किंवा 14 वर्षांची होती तेव्हा स्टार प्लसवरील ‘क्या मस्ती क्या धूम’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये तिने भाग घेतला होता. ही स्पर्धा तिने जिंकली देखील होती. त्यानंतर तिने  ललित कला केंद्रातून नृत्य विषयात एमए केलं आहे. म्हणजेच तिनं नृत्यात विशारद आणि अलंकार केलं आहे.

दरम्यान जुळून येती रेशीमगाठी  या मालिकेत तिनं साकारलेल्या मेघा देसाई  या व्यक्तिरेखेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. याच लोकप्रियतेच्या जोरावर तिला  खो-खो, संघर्ष, हंपी, ...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्येही काम करण्याची संधी मिळाली. सध्या ती  महाराष्ट्राची हास्यजत्रा  या विनोदी शोमध्ये होस्टच्या भूमिकेत झळकत आहे.   

टॅग्स :प्राजक्ता माळीसेलिब्रिटी