Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री प्राजक्ता माळी ओझरच्या विघ्नेशवरांच्या दर्शनाला, फोटो केले शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 12:57 IST

Prajakta Mali : प्राजक्ता माळी हिने नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. त्यातून ती ओझरच्या विघ्नेश्वरांच्या दर्शनाला गेल्याचे समजते आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. जुळून येती रेशीमगाठी मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहचली. ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतेच तिने काही सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. त्यातून ती ओझरच्या विघ्नेश्वरांच्या दर्शनाला गेल्याचे समजते आहे.

प्राजक्ता माळीने इंस्टाग्रामवर ओझरच्या गणपतीचे दर्शन घेतानाचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने लिहिले की, श्री क्षेत्र ओझर..विघ्नहर गणपती- अष्टविनायक. कार्यक्रमांच्या निमित्ताने होणारी देवदर्शने..प्राजक्ताच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. चाहते तिचे आभार मानत आहेत की, तिच्यामुळे घरबसल्या ओझरच्या विघ्नहर गणपतीचे दर्शन झाले.

प्राजक्ता माळीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिची रानबाजार वेबसिरीज चांगलीच गाजली होती. सध्या प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. याशिवाय ती सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असते. तसेच ती आज अभिनेत्री असण्यासोबतच एक उद्योजिका आणि व्यावसायिकादेखील आहे. तिचा प्राजक्तराज या नावाने दागिण्यांचा ब्रँड आहे. तर, तिचं स्वत:चं फार्महाऊसदेखील आहे.

टॅग्स :प्राजक्ता माळी