Join us

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, साडीत दिसतेय ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2020 15:50 IST

सध्या सगळीकडे दिवाळीचा उत्साह आहे.

सध्या सगळीकडे दिवाळीचा उत्साह आहे. कोरोनाकाळात एकत्र जमण्यावर बंदी असली  घरच्याघरी मात्र मोठ्या उत्साहात लोक दिवाळीचा सण साजरा करतील. तरीही दिवाळीचा उत्साह मात्र आपल्याला कायम दिसतोय. सेलिब्रेटीही दिवाळीच्या मूडमध्ये रंगले आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळीने इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर गोल्डन रंगाचच्या साडीमधले फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत प्राजक्ता खूपच सुंदर दिसते आहे. प्राजक्ताने गळ्यात लाल रंगाचा सेट घातला आहे. प्राजक्ताचे साडीतले फोटो तिच्या चाहत्यांना आवडले आहेत.  या फोटोंवर नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत. या फोटोत प्राजक्ता खूपच सुंदर दिसते आहे.

सध्या प्राजक्ता छोट्या पडद्यावरील कॉमेडी शो 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'चे सूत्रसंचालन करताना दिसते आहे. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत. 

मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये तिने विविध भूमिका साकारल्या आहेत. प्राजक्ता प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने अरंगेत्रम आणि विशारद पूर्ण केले आहे. यासह प्राजक्ताला सांस्कृतिक विभागाकडून भरतनाट्यमसाठी शिष्यवृत्तीही देण्यात आली आहे.

टॅग्स :प्राजक्ता माळी