Join us
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्यांत अश्रू अन् मनात असंख्य आठवणी, लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्रीने घेतली एक्झिट, म्हणाली-"गेली २ वर्ष..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 11:13 IST

२ वर्षांचा प्रवास संपला! लोकप्रिय मालिकेतून आणखी एका अभिनेत्रीची एक्झिट,भावुक होत म्हणाली...

Television: छोट्या पडद्यावरील 'येड लागलं प्रेमाचं' ही लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. मालिकेतील संस्कारी मंजिरी आणि रांगडा गडी राया यांची जोडी प्रेक्षकांना भावली आहे. 'येड लागलं प्रेमाचं' मधील इतर पात्रांनाही प्रेक्षकांनी कायम भरभरून प्रेम दिलं आहे. अलिकडेच मालिकेत जीजींचं पात्र साकारणार्‍या अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी एक्झिट घेतली. त्यानंतर मालिकेतून आणखी एका अभिनेत्रीची एक्झिट झाली आहे. 

दरम्यान, या अभिनेत्रीचं नाव प्राजक्ता नवनाळे आहे. येड लागलं प्रेमाचं या मालिकेत तिने साकारलेलं रुजुता हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. मात्र, जवळपास २ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर आता रुजुता या पात्राचा प्रवास संपला आहे. याबाबत अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर भावुक पोस्ट शेअर करत त्यामध्ये लिहिलंय,"hey रुजुता I know सगळ्यात अवघड आणि खूप जड moment aahe हा….तो entry चा पहिला सीन आणि हा शेवटचा सीन सगळा प्रवास आठवला आणि राहावलं नाही. Thank u so much गं गोड मुली…रुजुताचा last scean आणि भारावून आलं.रुजुताचा प्रवास खूप भारी होता . गेले २ वर्ष रुजुतावर माझा लाडक्या प्रेक्षकांनी खूप प्रेम केल. प्रत्येक सीनची ,रुजुताच्या लुकची पोचपावती कायम मिळाली. २ वर्षात खूप काही शिकायला मिळाल. आज रुजुताचा गोड प्रवास इथेच थांबतोय….काय चुकलं असेल मोठ्या मनानी माफ करा. २ वर्षाचा हा लाडका प्रवास खूप मोठा आहे."

यानंतर मग अभिनेत्रीने पुढे लिहिलंय, "एखादं पात्र साकारतं असताना त्याची इतकी सवय होऊन जाते ना की कळत नाही. रोजच्या वागण्यात बोलण्यात सुद्धा ते पात्र कळत नकळत येत असतं. रोजचं रूटीन बसत. आणि अचानक आता हे सगळं नसणार तो सेट,ती मेकअप रूम, स्पॉट दादांनी बनवलेली ब्लॅक कॉफी … आल्या आल्या गरम गरम मिळालेली ती स्क्रिप्ट…मॅडम सिन साठी बोलावलय हा आवाज,रुजुताचा close लागलाय tuch up करा रे.पण या गोड आठवणी माझा मनात कायम मी जपून ठेवणार." 

गोड माणसांनी हा प्रवास अजून गोड झाला… 

"थोडा खेळकर स्वभाव असल्यामुळे अख्या सेट वर माझ्याच हसण्याचा आवाज असायचा… हसण्याच्या आवाजावरून कळायच रुजुता आली . या माझा गोड प्रवासात माझे co-actors खूप छान होते सगळे…. समजून घेऊन शांततेत मज्जा करत आम्ही सीन करायचो. आज वर ज्या मालिका केल्या त्यातला हा बेस्ट सेट होता…. माझा टीमच कौतुक कराव तेवड कमी आहे. गोड माणसांनी हा प्रवास अजून गोड झाला… माझ्या येड लागल प्रेमाच्या टीम ला माझाकडून खूप खूप thank u…thank u @star_pravah ,sol production माझ्यावर विश्वास दाखवून मला हे पात्र साकारायची संधी दिली. Dop Dada ‘ या पाहू ‘ हा शब्द आठवणीत राहील रुजुता निरोप घेते… पण पुढचा प्रवास याहून भन्नाट असणार आहे… तुमचं प्रेम आणि आशीर्वाद कायम पाठीशी राहील यात शंकाच नाही…. Thank u आंब्रपाली (आंब्रखंड)  हा गोड moment छान capture केलास.भेटू लवकरच नवीन काहीतरी घेऊन…", अशा आशयाची पोस्ट अभिनेत्रीने लिहिली आहे. दरम्यान, प्राजक्ताची ही पोस्ट पाहून चाहते देखील नाराज झाल्याचं पाहायला मिळतंय.

English
हिंदी सारांश
Web Title : Actress exits popular series with tears and fond memories.

Web Summary : Prajakta Navnale exits 'Yed Lagla Premacha' after two years. Her character, Rujuta, was loved by fans. She shared an emotional farewell post, thanking the team and viewers for their support and love. She cherishes the memories.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया