Television Actress: छोट्या पडद्यावर अनेक मालिका प्रदर्शित होत असतात. त्यातील काही मालिका या वर्षानुवर्ष प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात. अशीच एक मालिका म्हणजे पुढचं पाऊल.२०११ साली ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ही मालिका प्रदर्शित होत होती. मालिकेत कल्याणी, आक्कासाहेब ऊर्फ राजलक्ष्मी, रूपाली, कांचनमाला, पिंटू मामा, सोहम सरदेशमुख, रोहित सरदेशमुख ही पात्रे लोकप्रिय ठरली होती. दरम्यान एका लोकप्रिय अभिनेत्रीला तेव्हा या मालिकेची ऑफर मिळाली होती. मात्र तिने ही मालिका नाकारली, कोण आहे ती अभिनेत्री?
या अभिनेत्रीचं नाव नंदिनी वैद्य आहे.अलिकडेच इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री नंदिनी वैद्य यांनी याबाबत खुलासा केला आहे. त्यावेळी ती मालिका नं केल्याचा आजही अभिनेत्रीला पश्चाताप होत असल्यांचं त्यांनी सांगितलं. या मुलाखतीमध्ये नंदिनी वैद्य म्हणाल्या,"मी दुबईहून मुंबईत परत आल्यानंतर काम करायला मिळणार याचा आनंद होता. पण, इथे आल्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागली. मला असं वाटत आपल्याला इथे सगळे ओळखतात.त्यामुळे मला सहज काम मिळेल... पण, मुळात तसं काहीच नव्हतं. रोज आपल्याला संघर्ष करायचा हे मला तेव्हा जाणवलं. तेव्हा माझ्याकडे संधी बऱ्याच आल्या आणि त्यासाठी मेहनतही तितकीच घ्यावी लागली."
या मुलाखतीत नंदिनी वैद्य पुढचं पाऊल मालिकेबद्दल बोलताना म्हणाल्या,"त्यावेळी एक मोठी संधी माझ्या हातातून गेली. या मालिकेसाठी माझ्या कास्टिंगसह सगळ्या गोष्टी जुळून आल्या होत्या. आयरीस प्रोडक्शनची ती मालिका होती. कामाचे रोख पैसे, वेळेत शूटिंग आणि कुठेही त्रास नाही, अशीत त्यांची ओळख आहे. ती संधी माझी चुकली पण, नंतर त्यांच्या भाग्य दिले तू मला मालिकेत काम करायला मिळालं."
मालिका नाकारण्यामागचं हे होतं कारण...
मग त्यांनी सांगितलं,"काही टेक्निकल इश्यू,आऊटडोर शूटिंग आणि माझा मुलगा लहान असल्यामुळे मला नाही म्हणावं लागलं. ती मालिका जवळपास १० वर्ष चालली.मला आजही त्या गोष्टीचा पश्चाताप होतो. त्यावेळी मला असं वाटलं आपला मुलगा लहान आहे. ही मालिका नाहीतर दुसरी कोणतीही मालिका मिळेल. मुलाची जबाबदारी असल्यामुळे तो निर्णय मला नाही घेता आला. एक कलाकृती गाजते आणि आपल्याला माहित असतं की आपणही याचा भाग होऊ शकलो असतो. मला आजही त्याचा त्रास होतो."
वर्कफ्रंट
नंदिनी वैद्य यांनी आजवर अनेक गाजलेली नाटके, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'भाग्य दिले तू मला', 'कोण होतीस तू, काय झालीस तू' यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.
Web Summary : Nandini Vaidya regrets declining 'Pudhcha Paul' due to her young son. The series became a hit, and she acknowledges the missed opportunity despite later working with the same production house.
Web Summary : नंदिनी वैद्य को 'पुढचं पाऊल' सीरियल ठुकराने का पछतावा है क्योंकि उनका बेटा छोटा था। श्रृंखला हिट हो गई, और बाद में उसी प्रोडक्शन हाउस के साथ काम करने के बावजूद, वह अवसर चूकने की बात स्वीकार करती हैं।