Join us
Daily Top 2Weekly Top 5

मृणाल दुसानिसची लेक नुरवीची दिसली पहिली झलक; अभिनेत्रीच्या गोंडस लेकीचा व्हिडीओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 13:29 IST

काही दिवसांआधीच तिने एका गोंडस मुलीचा जन्म दिला आहे. मृणालने आपल्या मुलीचं नाव नुरवी असं ठेवलं आहे.

‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून अभिनेत्री मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) घराघरात पोहोचली. त्यानंतर तू तिथे मी, अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेत तिने काम केलं. ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकेत काम करत असतानाच, मृणालने काही कालावधीसाठी ब्रेक घेतला होता. त्यानंतर ती ‘हे मन बावरे’ या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकली होती. तूर्तास मृणाल मातृत्वाचा आनंद घेतेय. काही दिवसांआधीच तिने एका गोंडस मुलीचा जन्म दिला आहे. मृणालने आपल्या मुलीचं नाव नुरवी असं ठेवलं आहे. मृणाल अनेकवेळा मुलीसोबतचे खेळतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. पण त्यात कधी मुलीचा चेहरा तिने दाखवला नाही. आता पहिल्यांदाच अभिनेत्रीने तिच्या मुलीचा चेहरा सोशल मीडियावर दाखवला आहे. 

मृणालने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मृणालने नुरवीची पहिली झलक चाहत्यांना दाखवली आहे. मृणालची मुलगी नुरवी खूपच क्युट आहे. मृणालने शेअर केला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सेलिब्रेटींसह चाहते या व्हिडीओवर कमेंट्स करतायेत. सो क्युट, लयभारी, खूप प्रेम, खूपच सुंदर अशा कमेंट्स मृणालच्या व्हिडीओवर येतायते. 

मृणालने 2016 मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर नीरज मोरेसोबत अरेंज मॅरेज केलं होतं. कांदेपोहेच्या कार्यक्रमात मृणाल आणि नीरज पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. नीरज अमेरिकेत राहात असून मृणाल देखील सध्या तिथेच असते. मृणालने 24 मार्चला मुलीला जन्म दिला.

टॅग्स :मृणाल दुसानीसटिव्ही कलाकार