Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ससुराल सिमर का' फेम अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर ६ वर्षांनी घरी पाळणा हलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 10:54 IST

अभिनेत्रीने बहिणीच्या दिराशीच केलं लग्न, आता होतोय अभिनंदनाचा वर्षाव

टीव्ही अभिनेत्री काजोल श्रीवास्तव (Kajol Srivastava) आई होणार आहे. लग्नानंतर ६ वर्षांनी काजोल आणि पती अंकित खरेच्या घरी पाळणा हलणार आहे. काजोलने सोशल मीडियावर ही गुडन्यूज शेअर करत ९ महिन्यांचा प्रवासही दाखवला आहे. 'ससुराल सिमर का' मालिकेतून काजोल लोकप्रिय झाली होती. तिने 'अशोक सम्राट', 'शुभ शगुन', 'राधाकृष्ण' या मालिकांमध्येही काम केलं. आता नुकतंच बेबी बंप फ्लॉन्ट करत तिने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.

काजोल श्रीवास्तवने ६ वर्षांपूर्वी अंकित खरेसोबत लग्नगाठ बांधली होती. आता व्हिडिओ शेअर करत ती म्हणाली की पहिल्या महिन्यात तर तिला कळलंही नाही की ती प्रेग्नंट आहे. जेव्हा समजलं तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. अंकितने दोघांसाठी मालदीव ट्रीपही बुक केल्याचं ती व्हिडिओत सांगते. यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. 

काजोल श्रीवास्तवने २०१९ साली खजुराहो येथे अंकित खरेसोबत लग्न केलं होतं. २०१८ मध्ये त्यांचा साखरपुडा झाला होता. अंकित खरे अमेरिकेत कार्यरत आहे. तसंच अंकित काजोलच्या बहिणीचा दीरही आहे. काजोलने एका मुलाखतीत सांगितले होते की तिचा लग्नाचा विचार नव्हता मात्र अंकितच्या आईनेच मागणी घातली होती. नंतर आईवडिलांच्या सांगण्यावरुन काजोलने अंकितला लग्नासाठी होकार दिला होता.

टॅग्स :टिव्ही कलाकारप्रेग्नंसी