Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सुख म्हणजे...' च्या गिरीजाने घेतली '12th फेल' मधील IPS मनोज शर्मांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2024 11:42 IST

सुख म्हणजे नक्की काय असतं या लोकप्रिय मालिकेतील गिरीजा प्रभूने IPS मनोज शर्मांची भेट घेतली आहे. हा फोटो चांगलाच व्हायरल झालाय

'12th फेल' सिनेमा २०२३ मध्ये चांगलाच गाजला. माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर '12th फेल' सिनेमाने लोकांकडून चांगली पसंती मिळवली. विक्रांत मेस्सीने सिनेमात प्रमुख भूमिका साकारली. '12th फेल' सिनेमा IPS अधिकारी मनोज शर्मा यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. मनोज शर्मा आणि त्यांची पत्नी श्रद्धा यांच्या आयुष्यावर हा सिनेमा सर्वांना प्रेरणा देऊन जातोय. नुकतीच मराठमोळी अभिनेत्री गिरीजा प्रभूने मनोज शर्मांची भेट घेतली.

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गिरीजा प्रभूने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केलाय. यात तिच्यासोबत IPS मनोज शर्मा दिसत आहेत. ही भेट कशी झाली? या भेटीमागचं कारण काय? हे अद्याप समोर आलं नाहीय. पण मनोज शर्मा यांना भेटून गिरीजाच्या चेहऱ्यावर आनंद झळकतोय, एवढं मात्र नक्की. गिरीजा - मनोज यांच्या भेटीचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. 

IPS मनोज शर्मा हे त्यांच्या प्रामाणिक कार्यामुळे प्रशासकीय खात्यात ओळखले जात आहेत. अलीकडेच मनोज कुमार शर्मा यांना महाराष्ट्र पोलिस दलातील उपमहानिरीक्षक (DIG) वरून महानिरीक्षक (IG) पदावर बढती देण्यात आली आहे. मनोज हे सध्या मुंबईत त्यांची जबाबदारी सांभाळत आहेत. मनोज आणि  गिरीजा यांची फिल्मसिटीत भेट झाल्याचं दिसून येतंय.

टॅग्स :बॉलिवूडविक्रांत मेसीमराठी