Join us
Daily Top 2Weekly Top 5

"अ‍ॅक्शन सीन शूट करताना गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीने मांडलं दु:ख, भावुक होत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 10:42 IST

"अ‍ॅक्शन सीन शूट करताना गर्भपात झाला अन् नंतर...", प्रसिद्ध अभिनेत्रीने गमावलेलं पहिलं बाळ, म्हणाली...

Gauhar Khan : बॉलिवूड चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे गौहर खान (Gauhar Khan). सध्या गौहर खान दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत आली आहे. गौहर खान आणि तिचा पती जैद दरबार लवकरच त्यांच्या दुसऱ्या मुलाचे स्वागत करणार आहेत. परंतु, अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या पहिल्याच गरोदरपणात गर्भपात झाल्यांचं तिने उघडपणे सांगितलं. 

अलिकडेच गौहर खानने देबिना बनर्जीच्या पॉडकास्ट मध्ये हजेरी लावली. त्यादरम्यान अभिनेत्री म्हणाली, तिने वयाच्या ३६ व्या वर्षी झैज दरबारशी लग्न केलं होतं आणि लग्नानंतर तिला लगेच फॅमिली प्लॅनिंग करु लागली होती. पण, त्यावेळी सगळं ठीक होईल असं वाटत होतं, पण मी माझं मूल गमावेन असं कोणालाही वाटलं नव्हतं. असं अभिनेत्रीने सांगितलं. त्या प्रसंगातून शारीरिक आणि मानसिकरित्या सावरण्यासाठी तिला दीड वर्ष लागले. त्यानंतर, ती दुसऱ्यांदा गर्भवती राहिली आणि तिने एका मुलाला जन्म दिला. 

नेमकं काय घडलेलं?

या मुलाखतीत गौहरने सांगितलं की, तिच्या पहिल्या प्रेग्नंन्सीदरम्यान ती पूर्णपणे कामात गुंतली होती. त्यावेळी गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांत तिने अॅक्शन सीन्स शूट करावे लागले. तेव्हा ती 'शिक्षा मंडळ' चित्रपटाचे शूट करत होती, ज्यामध्ये तिला घोडेस्वारीसारखे अ‍ॅक्शन सीन करावे लागले होते, ज्यामुळे अवघ्या एका महिन्यानंतर तिचा गर्भपात झाला. 

दरम्यान, डिसेंबर २०२० मध्ये गौहर खान आणि जैद यांनी लग्न केलं होतं. त्यानंतर २०२३ साली तिने त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला होता. आता या जोडप्याच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हळणार आहे. लग्नानंतर चार वर्षांनी गौहर दुसऱ्यांदा आई होणार आहे. अलिकडे गौहर आणि झैदने त्यांच्या सोशल मीडियावर एक क्यूट व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. 

टॅग्स :गौहर खानटिव्ही कलाकार