Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर ५ वर्षांनी पती अन् लेकासोबत दिसली दिशा वकानी, नवरात्रोत्सवात 'दयाबेन' चा गरबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 09:52 IST

दयाबेन उर्फ अभिनेत्री दिशा वकानी नवरात्रोत्सवात सहभागी झाली

'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashma) ही मालिका पाहिलीच नाही असा कोणीच नसेल. या विनोदी मालिकेतील सर्वच पात्र प्रचंड लोकप्रिय झाली. गेल्या १४ वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. विशेषत: 'दयाबेन' या व्यक्तिरेखेचे लोक चाहतेच झाले. दयाबेनचा आवाज, बोलण्याची स्टाईल, गरबा खेळण्याची स्टाईल सगळंच मजेशीर होतं. अभिनेत्री दिशा वकानीने (Disha Vakani) दयाबेन हे पात्र साकारलं. दिशाने मालिका सोडल्यानंतर सर्वांचाच हिरमोड झाला होता. नंतर तिच्यासारखं पात्र कोणालाच साकारता आलं नाही. आता अनेक वर्षांनंतर दिशा वकानी दिसली  आहे. लेकासोबतचा तिचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

अभिनेत्री दिशा वकानी नुकतीच पती आणि मुलासोबत एका इव्हेंटमध्ये दिसली. यावेळी तिने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला होता. तिच्या गोंडस मुलाने सर्वांचंच लक्ष वेधलं. दिशा पती आणि मुलासोबत नवरात्री सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाली होती. दिशा लग्नानंतर घर-संसारात रमली. लग्नानंतर ५ वर्षांनी ती अचानक माध्यमांसमोर आल्याने सगळ्यांनाच आनंद झाला. 

दिशा वकानीने २०१७ मध्ये तारक मेहता मालिकेतून एक्झिट घेतली होती. कारण त्याच वर्षी तिने मुलीला जन्म दिला. लेकीच्या जन्मानंतर दयाबेन मालिकेत परत येईल असं सगळ्यांना वाटत होतं. मात्र ५ वर्ष झाली दिशा परत आलीच नाही. तर गेल्यावर्षी दिशाने मुलाला जन्म दिला. यानंतर ती परत येणार या चर्चांना पूर्णविरामच लागला. फक्त तारक मेहताच नाही तर दिशाने अॅक्टिंग करिअरमधूनच ब्रेक घेतला.

टॅग्स :दिशा वाकानीतारक मेहता का उल्‍टा चश्‍माटिव्ही कलाकारशारदीय नवरात्रोत्सव 2023