Join us
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोटानंतर आलेली घर विकायची वेळ! आता अभिनेत्रीने मुलासह केला नवीन घरात प्रवेश, झाली भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 18:14 IST

२०२४ मध्ये एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा घटस्फोट झाल्याने तिला राहतं घर विकावं लागलं होतं. पण आता अभिनेत्रीने नवीन घर घेतल्याने सर्वांनी तिचं अभिनंदन केलं

लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री दलजीत कौर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. निखिल पटेलसोबतच्या घटस्फोट झाल्यानंतर आता दलजीतने आयुष्यात एक सकारात्मक निर्णय घेतला आहे. दलजीतने मुंबईत स्वतःचे नवीन घर खरेदी केले असून तिने मुलासोबत या नवीन घरात गृहप्रवेश केला आहे. या आनंदाच्या क्षणाचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला असून तो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

गेल्या काही काळापासून दलजीत कठीण प्रसंगातून जात होती. २०२४ ला दलजीतचा जेव्हा घटस्फोट झाला होता तेव्हा तिला काही कारणास्तव स्वतःच्या कमाईतून घेतलेलं राहतं घर विकावं लागलं होतं. मात्र, आता सर्व जुन्या गोष्टी मागे सारून तिने मुलगा जॅडनसह नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दलजीत आणि जॅडन गृहप्रवेशाची पूजा करताना दिसत आहेत. एकूणच दलजीतने घटस्फोटाचा धक्का सहन करुनही सकारात्मकतेने आयुष्याची नवी सुरुवात केल्याने सर्वांनी तिच्यावर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

दलजीतने हा व्हिडिओ शेअर करताना एक भावुक कॅप्शनही लिहिले आहे. तिने म्हटले की, "कठोर परिश्रम आणि संयमानंतर शेवटी आम्हाला राहण्यासाठी आमचं हक्काचं ठिकाण मिळालं आहे." तिच्या या व्हिडीओवर टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील तिचे मित्र-मैत्रिणी आणि चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. "तू खरोखरच एक सक्षम महिला आहेस," अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी तिचे कौतुक केले आहे.

वैयक्तिक आयुष्यातील वाद

दलजीत कौर गेल्या वर्षी निखिल पटेलसोबत लग्न करून केनियाला स्थायिक झाली होती. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच त्यांच्यात वाद निर्माण झाले आणि दलजीत आपल्या मुलासह भारतात परतली. घटस्फोटानंतर आर्थिक अडचणींमुळे दलजीतला मुंबईतील राहतं घरही विकावं लागलं होतं. त्यानंतर ती मुंबईत भाड्याच्या घरात राहत होती. आता स्वतःचे घर घेतल्यामुळे तिने मुंबईत राहण्यासाठी हक्काची जागा मिळवली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Daljeet Kaur buys new house in Mumbai after divorce struggle.

Web Summary : Actress Daljeet Kaur, after a divorce and selling her house, has bought a new home in Mumbai with her son. She shared a video of the housewarming ceremony. Daljeet faced financial difficulties after her divorce from Nikhil Patel but started a new life positively.
टॅग्स :दलजीत कौरसुंदर गृहनियोजनगृह सजावटटेलिव्हिजनटिव्ही कलाकारसेलिब्रिटी