प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भारती आणि हर्षच्या चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे, कारण या जोडीने अखेर त्यांचा धाकटा मुलगा 'काजू' म्हणजेच यशवीरचा चेहरा जगासमोर आणला आहे. भारती सिंहने तिच्या अधिकृत यूट्यूब व्लॉगद्वारे मुलाचा चेहरा रिव्हील केला असून, याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
चाहत्यांची उत्सुकता संपली भारती सिंहने गेल्या वर्षी आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला होता. तेव्हापासून ती अनेकदा व्लॉगमध्ये त्याची झलक दाखवत होती, पण भारतीने काजूचा चेहरा मात्र लपवून ठेवला होता. काजू कसा दिसतो हे पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक होते. अखेर एका विशेष व्लॉगमध्ये भारती आणि हर्षने काजूचा चेहरा सर्वांना दाखवला आहे. काजूचा चेहरा समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
Web Summary : Bharti Singh and Haarsh Limbachiyaa revealed their son 'Kaju's' face on YouTube, delighting fans. The couple previously kept his appearance hidden, generating much anticipation. Many fans commented on Kaju's resemblance to his elder brother, 'Gola'. A party was held to celebrate the reveal.
Web Summary : भारती सिंह और हर्ष लिंबाचिया ने यूट्यूब पर अपने बेटे 'काजू' का चेहरा दिखाया, जिससे प्रशंसक खुश हो गए। दंपति ने पहले उनकी उपस्थिति को छिपा रखा था, जिससे बहुत प्रत्याशा पैदा हुई। कई प्रशंसकों ने काजू की अपने बड़े भाई 'गोला' से समानता पर टिप्पणी की। इस रहस्योद्घाटन का जश्न मनाने के लिए एक पार्टी आयोजित की गई।