Join us
Daily Top 2Weekly Top 5

'देवमाणूस'मधील सीन शूट करता करता डिंपल फुटला चांगलाच घाम, खुद्द तिनेच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 13:12 IST

देवमाणूस (Devmanus ) या मालिकेने पहिल्या पर्वापासूनच प्रेक्षकांना टेलिव्हिजन स्क्रीनला खिळवून ठेवलं आहे. या मालिकेतील प्रसंग प्रेक्षकांना थक्क करतात.

देवमाणूस (Devmanus ) या मालिकेने पहिल्या पर्वापासूनच प्रेक्षकांना टेलिव्हिजन स्क्रीनला खिळवून ठेवलं आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांना आपल्यातील एक वाटतात. या मालिकेतील प्रसंग प्रेक्षकांना थक्क करतात. नुकतंच या मालिकेतील देवमाणसाची प्रमुख भूमिका निभावणारा अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad) याने नुकतंच एक प्रसंग चित्रित करताना थक्क झाला असल्याचं सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना सांगितलं.

मालिकेचं चित्रीकरण करत असताना असा काही प्रसंग चित्रित करावा लागेल अशी कल्पना देखील नव्हती असं देखील तो म्हणाला. हा नक्की कुठला प्रसंग आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. अनेक तर्कवितर्क लावत असतानाच या मालिकेतील डिम्पल म्हणजेच अभिनेत्री अस्मिता देशमुख(Asmita Deshmukh)  हिने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

 ज्यात ती म्हणाली, "डिंपल या पात्राने नाव आणि ओळख मिळवून दिली.. प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले.. पण नुकताच मालिकेतला एक प्रसंग चित्रित करताना अंगावर काटा आला..हा प्रसंग चित्रित करण्याआधी मी खूप घाबरले होते आणि नकारही दिला होता..पण दिग्दर्शक आणि सहकलाकारांनी प्रोत्साहन दिल्यानंतर हा प्रसंग चित्रित झाला. कलाकार म्हणून डिंपलची व्यक्तिरेखा निभावताना जितकी गंमत येते तितकाच कधी कधी त्रास ही होतो.. देवमाणूस ही अशी मालिका आहे जिथे कलाकाराचा खरा कस लागतो. अनेकजण भेटून सांगत होते की या सीझनला थोडी गंमत कमी वाटते तर त्या आमच्या प्रेक्षकांना मी आवर्जून सांगेन की खरा खेळ तर आत्ता सुरु होतोय..या आठवड्यातले एपिसोड अजिबात मिस करु नका...डिंपल नाम सुन के सिंपल समझे क्या...सिंपल नहीं डेंजर है मैं.." 

टॅग्स :'देवमाणूस २' मालिकाटिव्ही कलाकारझी मराठी