Join us
Daily Top 2Weekly Top 5

यंदाचा 'व्हॅलेंटाइन्स डे' ठरला खास; विकी जैन नाही तर 'या' व्यक्तीसोबत डिनर डेटवर गेली अंकिता लोंखडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 12:51 IST

अभिनेत्री अंकिता लोंखडे कायम चर्चेत असते.

'पवित्रा रिश्ता' मालिकेत अर्चना हे पात्र साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोंखडे कायम चर्चेत असते. नुकतेच अंकिता पती विकी जैनसोबत 'बिग बॉस १७' मध्ये सहभागी झाली होती. यावेळी अंकिता आणि विकीच्या भांडणांनी अनेकांचं लक्ष वेधलं होतं. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर मात्र दोघांनी त्यांच्यामधील प्रेम कायम असल्याचं सांगितलं. पण, या  'व्हॅलेंटाइन्स डे'ला विकी जैन अंकितासोबत दिसला नाही. अंकिता एका दुसऱ्याचं खास व्यक्तीसोबत डिनर डेटवरही गेली होती. 

अंकिता लोंखडेसाठी हा 'व्हॅलेंटाइन्स डे' खास ठरला. कारण अंकिता तिच्या आजीसोबत डिनर डेटला गेली होती. अंकिता लोखंडेला तिच्या कुटुंबासह एका रेस्टॉरंटबाहेर पापाराझींनी स्पॉट केले. यावेळी तिची आजी तिच्यासोबत दिसली. तसेच आज तिच्यासोबत विकी जैन नसला तरी त्यानं बिलासपूरवरुन गिफ्ट पाठवल्याचं सांगितलं. अंकिता म्हणाली, 'आज त्यांची खूप आठवण येत आहे. पण त्यानं बिलासपूरहून व्हॅलेंटाईन गिफ्ट पाठवले आहे, जे मला खूप आवडले. भेटवस्तू महत्त्वाच्या असतात. भेटवस्तू वेळेवर मिळायला हव्यात', असही ती गमतीत म्हणाली. पण, अभिनेत्रीने तिला गिफ्ट म्हणून काय मिळाले हे सांगितले नाही.

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या बिग बॉस 17 च्या प्रवासाविषयी बोलायचे झाले तर, या दोघांनी या शोमध्ये खूप भांडण केली. कुटुंबीयांनादेखील शोमध्ये येऊन त्यांना समजावून सांगावं लागलं होतं. बिग बॉसच्या घरात विकी त्याच्या गेम माईंडमुळे चर्चेत राहिला. तर  अंकिता आणि विकी यांच्यातील भांडण इतके वाढले होते की अभिनेत्रीने घटस्फोट घेण्यावरही भाष्य केलं होतं. दोघांनी बिग बॉसच्या घरात एकत्र प्रवेश केला होता. पण, फक्त अंकिताच अंतिम फेरीत पोहोचू शकली. विकी जैनने टॉप 6 मध्ये स्थान मिळवले होते, परंतु तो टॉप 5 मध्ये पोहोचू शकला नाही.

टॅग्स :अंकिता लोखंडेसेलिब्रिटीबॉलिवूडबिग बॉसव्हॅलेंटाईन्स डे