Join us

विक्रम गायकवाडची पत्नी आहे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री, अनेक मालिकांमध्ये केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 15:59 IST

अभिनय क्षेत्रात काम करणा-या पती-पत्नी कलाकारांच्या कितीतरी जोड्या आहेत.

सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी व्चाहिहत्यांना नेहमीच आवडतं. तसेच त्यांच्या अफेयर, लव्ह लाइफबद्दल जाणून घ्यायला देखील चाहत्यांना आवडतं. ते कुठे राहतात, त्यांना काय आवडतं त्यांच्या कुटुंबात कोणकोणत असते, हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. अभिनेता विक्रम गायकवाडची पत्नीदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 

अभिनय क्षेत्रात काम करणा-या पती-पत्नी कलाकारांच्या कितीतरी जोड्या आहेत. अशीच एक जोडी आहे विक्रम गायकवाड आणि त्याच्या पत्नीची. विक्रम गायकवाड याने मराठी मालिका तसेच चित्रपट सृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

उंच माझा झोका मालिकेने विक्रमला अमाप लोकप्रियता मिळवून दिली होती.स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत विक्रमने शहाजीराजेंची भूमिका साकारली होती. क्रमने फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या तो ‘छोट्या बयोची मोठी स्वप्न’ या मालिकेत बयोच्या वडिलांची भूमिका साकरतो आहे.

विक्रमची पत्नी अक्षता कुलकर्णीसुद्धा अभिनेत्री आहे. अभिनेत्री अक्षता कुलकर्णी गायकवाड हिने अनेक नाटक, मालिकांमधून छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. हिंदी मालिका मेरे साईं मधून ती महत्वाची भूमिका साकारताना दिसली. योगयोगेश्वर जयशंकर मालिकेत तिने वंदनाची भूमिका साकारली होती.  २०१३ साली अक्षताने लोकप्रिय अभिनेता विक्रम गायकवाड सोबत लग्न केले. दोघांना तावी नावाची मुलगीदेखील आहे.  

टॅग्स :टिव्ही कलाकार