Join us
Daily Top 2Weekly Top 5

टीव्हीवरील अभिनेत्याचा संसार मोडण्याच्या मार्गावर ?, पत्नीने शेअर केली पोस्ट, म्हणाली-तुझं खोटे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 14:16 IST

मीडिया रिपोर्टनुसार, विजयेंद्र आणि प्रीतीने सोशल मीडियावरून एकमेकांना अनफॉलो केलं आहे.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता विजयेंद्र कुमेरिया सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नागिन 4 अभिनेत्याची पत्नी प्रीती भाटियाने एक धक्कादायक पोस्ट शेअर केली आहे. या शेअर केलेल्या पोस्टवरून अभिनेत्याचे लग्न धोक्यात असल्याची चर्चा सुरु झाली आहे. खरं तर, प्रीतीने अलीकडेच तिची मुलगी किमायासोबतचा एक फोटो पोस्ट केला आणि लिहिले की, तू माझ्याशी आतापर्यंत जितकं खोटं बोलला आहेस त्यापैकी 'आय लव्ह यू' हे माझं आवडते आहे आणि 'आय मिस यू' हे सगळ्यात चांगलं होतं. तिची ही  पोस्ट बघून नेटकरी हैराण झाले आहेत.

विजयेंद्र आणि प्रीतीने केलं एकमेकांना अनफॉलोमीडिया रिपोर्टनुसार, विजयेंद्र आणि प्रीतीने सोशल मीडियावरून एकमेकांना अनफॉलो केलं आहे. याप्रकरणी जेव्हा मीडियाने  अभिनेत्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याने फोन उचलला नाही. तर दुसरीकडे त्याची पत्नी प्रीतीनेही याप्रकरणी थेट काहीही बोलण्यास नकार दिला. ती म्हणाले की, मी सध्या खूप व्यस्त आहे, या प्रकरणी कोणतेही वक्तव्य करू इच्छित नाही. लोक या प्रकरणी का अंदाज लावत आहेत हे मला समजत नाही.

अभिनेत्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, विजयेंद्र 'शास्त्री सिस्टर', 'उडान', 'नागिन 4', 'मोह से चल क्या जाये' आणि 'आपकी नजरों ने समझा' सारख्या हिट टीव्ही शोमध्ये दिसला आहे. तर, प्रीती तिचे प्रोडक्शन हाऊस सांभाळते, जे तिने अनेक वर्षांपूर्वी सुरू केले होते. 

टॅग्स :टिव्ही कलाकारघटस्फोट