२७ एप्रिलपासून स्टार प्रवाहवर भेटीला येणाऱ्या बाई तुझा आशीर्वाद मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. ज्या घराला बाईच्या असण्याचीच सवय नाही, अशा पूर्णपणे पुरुषप्रधान घरात अवनीचं आगमन होतं… आणि तिथूनच नात्यांचा नवा प्रवास कसा सुरु होतो, हे पाहायला मिळणार आहे. या मालिकेत अनेक दिग्गज कलावंत आहेत. अवनीच्या बाबांच्या म्हणजेच चंद्रकांत देशमानेंची भूमिका साकारणार आहेत सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे.
चंद्रकांत देशमाने म्हणजे नाशिकमधील एक यशस्वी श्रीमंत उद्योजक. त्यांना आपल्या नावाचा, कुळाचा प्रचंड अभिमान आहे. बाप म्हणून अवनीवर प्रचंड जीव लावणारे मात्र पुरुषप्रधान विचारसरणीचे. त्यामुळे मुलीला बायकोला न विचारता निर्णय घेऊन ते जाहीर करुन मोकळे होतात. स्वभावाने थोडे हेकेखोर, हट्टी आणि तापट. देशमानेंच्या घरात मुलींना शिक्षणासाठी ना नाही. पण पदवी मिळाली की मुलीने लग्न करावं आणि सुखाने संसारात रमावं अशी विचारधारा आहे. मुलींना पंख दिले जातात ते उडण्यासाठी नाही तर लग्नाची वेळ येई पर्यंत घरच्या अंगणात बागडण्यासाठी असं मानणाऱ्या या देशमानेंच्या घरात अवनीला मात्र उंच उडायची स्वप्न पडतात आणि तिथून सुरु होते एका रंजक प्रवासाची गोष्ट.
चंद्रकांत देशमाने या भूमिकेविषयी सांगताना शरद पोंक्षे म्हणाले, ‘स्टार प्रवाह सोबत खूप जुनं नातं आहे. अग्निहोत्र, ठिपक्यांची रांगोळी या गाजलेल्या मालिकांनंतर बाई तुझा आशीर्वाद मध्ये एक वेगळी भूमिका साकारायला मिळणार आहे. चंद्रकांत देशमानेची काही तत्त्व आहेत. घरातल्या बाईला, घरातल्या मुलीला सर्व प्रकारचं स्वातंत्र्य द्यायचं. पण, नोकरी तिनं करायची नाही. नोकरीची काही गरज नाही, अशा मताचा तो आहे.''''त्यामुळे तो मुलीचे सगळे हट्ट पुरवतो, तिला जेवढं शिकायचंय तेवढं तो शिकवतो, पण नोकरी आणि करिअर करायची वेळ येते तेव्हा मात्र त्याची तत्त्व मध्ये येतात. तिथून खऱ्या संघर्षाला सुरुवात होते. प्रेक्षकांना ही मालिका नक्की आवडेल याची खात्री आहे.''; बाई तुझा आशीर्वाद ही नवी मालिका २७ एप्रिलपासून रात्री १० वाजता स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे.
Web Summary : Veteran actor Sharad Ponkshe plays Chandrakant Deshmane, a successful, traditional businessman in Star Pravah's 'Bai Tuza Ashirwad.' The story explores the clash between his patriarchal views and his daughter Avni's aspirations.
Web Summary : दिग्गज अभिनेता शरद पोंक्षे स्टार प्रवाह के 'बाई तुझा आशीर्वाद' में चंद्रकांत देशमाने की भूमिका निभा रहे हैं, जो एक सफल, पारंपरिक व्यवसायी हैं। कहानी उनके पितृसत्तात्मक विचारों और उनकी बेटी अवनी की आकांक्षाओं के बीच टकराव का पता लगाती है।