Join us

पुरुषांचं आयुष्य सोपं असतं? अभिनेत्याचा विचार करायला लावणारा व्हिडिओ, म्हणतो- "तो जन्माला आल्यापासून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 13:06 IST

संकेत कोर्लेकर या रीलमध्ये त्याच्या आईसोबत संवाद साधताना दिसत आहे. आईच्या प्रश्नांना हसत उत्तर देत त्यानंतर त्यामागची उदासीन कहाणी आणि सत्यपरिस्थिती तो सांगत आहे.

मराठी अभिनेता संकेत कोर्लेकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा तो त्याचे रील्स शेअर करताना दिसतो. त्याच्या रील्सला चाहत्यांची पसंतीही मिळते. त्याचे अनेक रील्स व्हायरलही झालेले आहेत. सध्या संकेतच्या एका रीलने लक्ष वेधून घेतलं आहे. या रीलमधून त्याने मध्यमवर्गीय घरातील सामान्य मुलाच्या आयुष्याबाबत भाष्य केलं आहे. 

संकेत कोर्लेकर या रीलमध्ये त्याच्या आईसोबत संवाद साधताना दिसत आहे. आईच्या प्रश्नांना हसत उत्तर देत त्यानंतर त्यामागची उदासीन कहाणी आणि सत्यपरिस्थिती तो सांगत आहे. 

आई : अरे आलास ऑफिसवरुन...कसा होता आजचा दिवस? 

संकेत : एकदम धमाल, बॉसने तर आज माझं इतकं कौतुक केलं ना आई...ऑफिसमध्ये आम्ही इतकी मज्जा करतो ना.. 

(ऑफिसमधल्या घाणेरड्या पॉलिटिक्समुळे ऑफिसमध्ये जायची इच्छाच होत नाही. पण, त्यांची तोडं बघायला रोज जावं लागतं. कोणासाठी??फॅमिलीसाठी...पुरुषाचं आयुष्य सोपंय...)

संकेत : आई अगं तू कुठे लग्नाचा विषय काढतेस. 

आई : अरे बाळा पण आता वय वाढत चाललंय ना...

संकेत : हो पण, तू कशाला काळजी करतेस... होणार सगळं व्यवस्थित होणार. तू कशाला विचार करते.

(आजकालच्या मुलींच्या वडिलांच्या अपेक्षा बघितल्यात...फ्लॅट हवाय..स्वाभिमानी आहोत आम्ही...आईबापाकडून पैसे घेऊन मुंबई किंवा पुण्यात फ्लॅट घेऊन त्यामध्ये मी माझ्या बायकोला ठेवू?)

संकेत : अगं पण, मला आता कमी पगाराची नोकरी आहे..भविष्यात तसं नसेल. मला असेल चांगला पगार...ठीके होऊयात वेगळं थँक्स 

पुरुष समजणं ही जगातील सगळ्यात सोपी गोष्ट आहे. पण, त्याला त्याची राणीच समजून घेऊ शकत नाही. हा त्याचा मोठा प्रॉब्लेम आहे. एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली जो कायम दबलेला असतो तोच पुरुष असतो. आणि लोक म्हणतात की पुरुषाचं आयुष्य सोपं असतं...

संकेतने बनवलेली ही रील विचार करायला लावणारी आहे. "तो आयुष्यभर फक्त समोरच्याचा विचार करतो. तो जन्माला आल्यापासून जबाबदारी स्वीकारतो. प्रेमात तर कायम चिरडला जातो. एक साध्या संस्कारी घरातला मिडलक्लास पुरुष आयुष्यभर रडत असतो. आयुष्यात सगळीकडे चुका पण पार्टनर निवडण्यात चुकू नका. पार्टनर निवडण्यात जिंकलात तर यश मिळेल आणि चुकलात तर आयुष्य जिवंतपणी नरक", असं कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिलं आहे. त्याच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. 

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठी अभिनेता