Join us

"जे झालं ते वाईट...", दुसऱ्या घटस्फोटानंतर संजीव सेठ यांची प्रतिक्रिया; १६ वर्षांचा संसार मोडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 16:08 IST

संजीव सेठ यांनी अभिनेत्री रेशम टिपणीससोबत पहिलं लग्न केलं होतं.

'ये रिश्ता क्या कहलाता है' या लोकप्रिय मालिकेत दिसलेले कलाकार संजीव सेठ (Sanjeev Seth)  आणि लता सबरवाल (Lata Sabharwal) खऱ्या आयुष्यातही नवरा-बायको होते. या कपलने १६ वर्षांचा संसार मोडला. त्यांचा घटस्फोट झाला. यामुळे अनेकांना धक्काच बसला होता. लता सबरवाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घटस्फोट जाहीर केला. तर आता संजीव सेठ यांनी घटस्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे. 

बॉम्बे टाईम्सशी बोलताना संजीव सेठ म्हणाले, "आमच्या लग्नाला १६ वर्ष झाले होते आणि आता जे काही झालंय ते दु:खदत आहे. पण आता मी यावर रडत बसू शकत नाही. आयुष्य पुढे चालत राहतं आणि आपल्याला पुढे जावंच लागतं. सध्या मी माझ्या कामावर लक्ष देत आहे. माझ्या मुलांसोबत वेळ घालवत आहे. माझ्या भविष्यावर लक्ष केंद्रित करत आहे."

संजीठ सेठ यांनी १९९३ साली मराठी अभिनेत्री रेशम टिपणीससोबत लग्न केलं होतं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. २००४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता.  नंतर संजीव सेठ यांनी लता सबरवालशी दुसरं लग्न केलं. २०१० मध्ये त्यांचं लग्न झालं. त्यांना एक मुलगा झाला. आता संजीव यांचा दुसऱ्यांदा घटस्फोट झाला आहे. 

संजीव सेठ भारतभर भटकंती करत असतात. वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. तेथील खाद्यपदार्थांवर ते व्हिडिओ बनवतात. 

 

टॅग्स :टिव्ही कलाकारघटस्फोटये रिश्ता क्या कहलाता है