'बिग बॉस मराठी ६'चा ग्रँड प्रिमिअर कलर्स मराठीवर सुरु आहे. सर्वांना या नव्या सीझनची गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. अशातच 'बिग बॉस मराठी ६' मध्ये स्पर्धक म्हणून कोण कोण दिसणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. अशातच या नव्या सीझनमध्ये अभिनेता सागर कारंडे सहभागी झाला आहे. सागरच्या खास एन्ट्रीने प्रेक्षकांमध्ये या नव्या सीझनविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.चला हवा येऊ द्याच्या माध्यमातून सागर कारंडेने प्रेक्षकांचं मन जिंकलंय. सागर कारंडेची घरात आल्याआल्या अभिनेत्री दिपाली सय्यदसोबत गट्टी जमली आहे. सागर कारंडेने आता बिग बॉस मराठी ६ मध्ये कशी कमाल करतो याकडे सर्वांचं लक्ष आहे. सागर कारंडेच्या एन्ट्रीने त्याच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. चला हवा येऊ द्या गाजवणारा सागर बिग बॉससारख्या घरात कसा खेळ करणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.
Web Summary : Actor Sagar Karande joins 'Bigg Boss Marathi 6' as a contestant, adding a touch of humor to the new season. The grand premiere is on Colors Marathi, creating excitement among viewers eager to see the new contestants and the unfolding drama.
Web Summary : अभिनेता सागर कारंडे 'बिग बॉस मराठी 6' में प्रतियोगी के रूप में शामिल हुए, जिससे नए सीज़न में कॉमेडी का तड़का लगेगा। कलर्स मराठी पर भव्य प्रीमियर शुरू हो गया है, दर्शक नए प्रतियोगियों और आगामी नाटक को देखने के लिए उत्साहित हैं।