Join us

टीव्ही अभिनेता रुशद राणा दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर, जाणून घ्या कोण आहे त्याची पत्नी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 18:33 IST

मराठमोळ्या रितीरिवाजानुसार रुशदचं लग्न पार पडलं. अनुपमा या मालिकेतील संपूर्ण टीमनं या लग्नाला हजेरी लावली होती.

Rushad Rana Wedding: प्रसिद्ध टीव्ही अभिनेता रुशद राणा (Rushad Rana)ने अखेर लग्नगाठ बांधली  आहे. या अभिनेत्याने त्याची दीर्घकाळाची मैत्रीण केतकी वालावलकर(Ketki Walawalkar)सोबत आज म्हणजेच ४ जानेवारी रोजी सात फेरे घेतले आहेत. आता या कपलचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

केतकी आणि रुशदच्या लग्नाचा फोटोया कपलनं मराठमोळ्या रितीरिवाजानुसार लग्न केलं. केतकीच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर, या खास दिवसासाठी तिने पिवळ्या आणि हिरव्या रंगाची महाराष्ट्रीयन साडीची निवड केली होती, ज्यासोबत तिने पारंपारिक दागिने देखील घातले होते. रुशद धोतर आणि कुर्तामध्ये दिसत होता. मराठी रितीरिवाजांनुसार दोघांचे लग्न झाले. रुशद पारशी आणि केतकी महाराष्ट्रीयन आहे.

रुशद आणि केतकी त्यांच्या लग्नासाठी खूप दिवसांपासून उत्सुक होते. वयाच्या 43 व्या वर्षी रुशद पुन्हा एकदा बोहल्यावर आहे. अभिनेत्याचे पहिले लग्न 2010 मध्ये झाले होते, परंतू हे नातं अवघ्या तीन वर्षात संपले. 2013 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. लग्न मोडल्यानंतर रुशदच्या आयुष्यात केतकी वालावलकरची एंट्री झाली.

लग्नाआधी या जोडप्याच्या प्री-वेडिंग फंक्शनचे फोटोही व्हायरल होत आहेत. रुशद आणि केतकीच्या लग्नसोहळ्याला टीव्ही जगतातील प्रसिद्ध स्टार्सनी हजेरी लावली होती. अनुपमा या मालिकेतील संपूर्ण कलाकार या कपलच्या लग्नाला आणि सर्व फंक्शनला पोहोचले होते.

कोण आहे केतकी वालावलकरकेतकी टीव्हीवरील हिट मालिका अनुपमाची क्रिएटिव्ह डायरेक्टर आहे. रुशद आणि केतकी यांची भेट अनुपमा या मालिकेच्या सेटवर झाली होती. तिथे दोघांची मैत्री झाली आणि नंतर प्रेम झाले. रुशद गेल्या अनेक वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीत आहे. हिप हिप हुर्रे या शोमधील राघव या पात्राच्या भूमिकेसाठी तो प्रसिद्ध आहे. यानंतर त्याने ससुराल सिमर का, अनुपमा, क्यूंकी सास भी कभी बहू थी, बडे अच्छे लगते हैं यांसारख्या शोमध्ये काम केले आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकार