काही महिन्यांपूर्वी शेफाली जरीवालाचं निधन झालं आणि सर्वांना मोठा धक्का बसला. टीव्ही अभिनेता पराग त्यागीने दिवंगत पत्नी शेफाली जरीवालाच्या लग्नाच्या वाढदिवशी भावनिक आठवणी शेअर केल्या आहेत. १२ ऑगस्ट रोजी त्यांच्या लग्नाला ११ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने परागने इंस्टाग्रामवर एक खास व्हिडिओ टाकला. त्यात पराग आणि शेफाली यांनी जे सुखद क्षण एकत्र घालवले, त्याच्या आठवणी दिसत आहेत.
परागची शेफालीसाठी भावुक पोस्ट
परागने शेफालीसोबतचे व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "माझं प्रेम, माझी जान, माझी परी… १५ वर्षांपूर्वी तुला पाहिलं आणि मला जाणवलं की तूच माझ्यासाठी आहेस. ११ वर्षांपूर्वी तू माझी झालीस. तू मला इतकं प्रेम दिलंस की मी त्यासाठी पात्रही नव्हतो. तू माझं आयुष्य सुंदर केलंस. शेवटच्या श्वासापर्यंत आणि त्यानंतरही मी तुला प्रेम करत राहीन. १२ ऑगस्ट २०१० पासून आपण कायम एकत्र आहोत. कायम एकत्र राहण्यासाठी.” परागची ही पोस्ट भावुक करणारी आहे. अनेकांनी यानिमित्त शेफालीची आठवण जागवली आहे.
हा पोस्ट पाहून चाहत्यांनी परागला प्रेमळ संदेश पाठवले. काहीही झालं तरी की खरं प्रेम कधी मरत नाही, ते आठवणींमधून जिवंत राहतं. काहींनी त्यांच्या भावनांना सलाम केला. शेफाली जरीवाला ही ‘कांटा लगा’ गाण्यामुळे आणि काही हिंदी मालिकांमुळे लोकप्रिय झाली होती. बिग बॉसमध्येही ती सहभागी होती. पराग त्यागी आणि शेफाली हे इंडस्ट्रीतील एक आदर्श कपल म्हणून ओळखलं जात होतं. मात्र काही महिन्यांपूर्वी शेफालीचं निधन झालं आणि त्यामुळे परागवर दुःखाचा डोंगर कोसळला. शेफालीची साथ सुटल्यावर पराग अनेकदा सोशल मीडियावर शेफालीसोबतच्या आठवणी शेअर करताना दिसतात.