Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉस मराठीमधून निखिल दामले घराबाहेर, तीन आठवड्यातच प्रवास संपला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 21:32 IST

बिग बॉस मराठीच्या घरातून निखिल दामले घराबाहेर गेला आहे (bigg boss marathi 5, nikhil damle)

बिग बॉस मराठीच्या घरात आज डबल एविक्शन होणार आहे. या डबल एविक्शनमधून निखिल दामलेला घराबाहेर जावं लागलं आहे. या आठवड्यात निखिल, योगिता, सूरज आणि अभिजीत हे चौघे नॉमिनेट होते. यापैकी निखिल दामलेचा घरातला प्रवास संपला आहे. तीन आठवड्यात निखिलचा बिग बॉसंमधील प्रवास संपला आहे. निखिल दामलेने या घरात कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता वालावलकरसोबत घरात एन्ट्री केली होती. पण निखिलला बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागला आहे.

निखिल दामले बिग बॉसच्या घरातून बाहेर

निखिल दामले हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय चेहरा. बिग बॉसच्या घरात यायच्या आधी निखिल दामले रमा राघव या मालिकेत काम करत होता. ही मालिका संपल्यावर निखिलने बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली. निखिल घरात सुरुवातीपासून शांतच होता. दुसऱ्या आठवड्यात रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर निखिलला चांगलंच सुनावलं. परंतु तरीही निखिल घरात शांतच दिसला. अखेर आज निखिलला घरातून बाहेर जावं लागलं आहे. 

बिग बॉसच्या घरात डबल एविक्शन

'बिग बॉस मराठी'च्या या आठवड्यात सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, निखिल दामले आणि अभिजीत सावंत हे चार सदस्य डेंजर झोनमध्ये होते. या चार सदस्यांपैकी आज दोनजण घराबाहेर जाणार आहेत. त्यापैकी निखिल दामलेचं घरात पहिलं एविक्शन झालंय. आता निखिल गेल्यानंतर सूरज, योगिता आणि अभिजीत हे तिघेजण डेंजर झोनमध्ये आहेत. या तिघांपैकी आता कोण घराबाहेर जाणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीरितेश देशमुखकलर्स मराठी