Join us

बायकोच्या मैत्रिणीसोबतच अभिनेत्याचं अफेअर? टीव्ही कपलच्या नात्यात दुरावा, ४ वर्षांपूर्वीच झालंय लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 10:52 IST

सिनेइंडस्ट्रीतील अफेअर, ब्रेकअप आणि घटस्फोट हा कायमच चर्चेचा विषय असतो. सध्या टीव्ही इंडस्ट्रीमधली अशाच एका सेलिब्रिटी कपलच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

सिनेइंडस्ट्रीतील अफेअर, ब्रेकअप आणि घटस्फोट हा कायमच चर्चेचा विषय असतो. सध्या टीव्ही इंडस्ट्रीमधली अशाच एका सेलिब्रिटी कपलच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता नील भट आणि अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा यांच्या नात्यात दुरावा आल्याचं बोललं जात होतं. ते दोघं एकमेकांपासून वेगळे राहत असल्याच्याही चर्चा होत्या. अभिनेत्रीने या अफवा असल्याचं म्हटलं होतं. मात्र नीलने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण, आता नीलचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामुळे चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. 

नील भटचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत त्याला एका मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट करण्यात आलं आहे. व्हिडीओमध्ये नील हसतानाही दिसत आहे. नील भटसोबत असलेली ही मिस्ट्री गर्ल कोण? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. नीलसोबत दिसणारी ही मिस्ट्री गर्ल म्हणजे ऐश्वर्या आणि त्याची कॉमन फ्रेंड असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे मैत्रिणीनेच धोका दिला अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. मैत्रिणीमुळेच नील आणि ऐश्वर्याच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जात आहे. 

ऐश्वर्या आणि नील गेल्या कित्येक दिवसांपासून एकत्र दिसलेले नाहीत. ऐश्वर्याने गणशोत्सवही एकटीनेच साजरा केला. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये नील दिसला नाही. 'गुम है किसी के प्यार मे' मालिकेच्या सेटवर नील आणि ऐश्वर्याची गट्टी जमली होती. त्यानंतर २०२१ मध्ये त्यांनी पारंपरिक पद्धतीने लग्नाच्या बेडीत अडकत आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. 'स्मार्ट जोडी', 'बिग बॉस १७' या रिएलिटी शोमध्येही ते दिसले होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Actor's affair with wife's friend? Distance in TV couple's relationship.

Web Summary : Rumors swirl around TV couple Neil Bhatt and Aishwarya Sharma. Neil was spotted with a woman said to be Aishwarya's friend, fueling speculation of an affair and marital discord. The couple married in 2021 after meeting on set.
टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रिटी