Join us
Daily Top 2Weekly Top 5

Shaktimaan Back: दीर्घ काळानंतर पुन्हा येतोय 'शक्तिमान', यावेळी 300 कोटी रुपये लागणार पणाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 21:45 IST

शक्तिमान कोण होणार? या प्रश्नाला उत्तर देताना मुकेश खन्ना म्हणाले...

90 च्या दशकात 'शक्तिमान' (Shatimaan) या मालिकेने मुलांचे प्रचंड मनोरंजन केले. या सुपरहिरो शोमध्ये मुकेश खन्ना यांनी शक्तीमानची भूमिका साकारली होती. गेल्या अनेक दिवसांपासून, ही मालिका दुसऱ्या सीझनसह पुन्हा प्रेक्षकांच्या भेटिला येत असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, आता खुद्द मुकेश खन्ना यांनीच यासंदर्भात मोठा खुलासा केला आहे.

मालिका नाही, चित्रपट येणार -एका प्रसिद्ध वेबसाईटशी बोलताना मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी 'शक्तिमान'संदर्भात अनेक खुलासे केले. मुकेश खन्ना म्हणाले,  'हा प्रोजेक्ट माझ्याकडे बऱ्याच वर्षांनंतर आला आहे. मला अनेक लोक म्हणत होते, की आपण शक्तिमानचा दुसरा सिझन बनवा. पण, यावेळी मला शक्तिमानला टीव्हीवर नाही, तर चित्रपटात आणायचे होते."

सोनी पिक्चर्ससोबत करार - मुकेश खन्ना म्हणाले, 'मी सोनीसोबत करार केला आहे आणि त्यांनीही ही गोष्ट सार्वजनिक केली आहे. हा मोठा चित्रपट आहे. जवळपास 300 कोटी रुपयांचा. जोवर सर्वकाही निश्चित होत नाही, तोवर फारसे बोलता येणार नाही.'

पुन्हा होणार शक्तिमान? -'शक्तिमान' चित्रपट स्वरुपात आणण्यासंदर्भात मुकेश खन्ना म्हणाले, 'या चित्रपटाची कथा मी माझ्या पद्धतीने तयार केली आहे. या कथेत बदल होणार नाही, अशी अट मी त्यांना घातली होती. शक्तिमान कोण होणार? या प्रश्नाला उत्तर देताना मुकेश खन्ना म्हणाले, जर कुणी दुसरा शक्तीमान झाला तर देश त्याला स्वीकार करणार नाही.

टॅग्स :मुकेश खन्नाबॉलिवूड