Join us  

ज्या भावाने केलं होतं कन्यादान त्याच्याशीच पत्नीचं अफेअर, अभिनेता करण मेहराचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2022 8:57 PM

Karan Mehra & Nisha Rawal: अभिनेता करण मेहराने निशा रावलवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. करण मेहराने सांगितले की, निशा रावलचे तिच्या मानलेल्या भावासोबत विवाहबाह्य संबंध आहेत. तसेच मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.

मुंबई - टीव्ही कलाकार निशा रावल हिने गतवर्षी पती करण मेहरावर गंभर आरोप केले होते. तेव्हापासून हे दोन्ही कलाकार पती-पत्नी एकमेकांवर सातत्याने आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, हल्लीच प्रसारमाध्यमांशी संवाद साधत करण मेहराने निशा रावलवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. करण मेहराने सांगितले की, निशा रावलचे तिच्या मानलेल्या भावासोबत विवाहबाह्य संबंध आहेत. तसेच मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. केवळ मलाच नाही तर माझ्या कुटुंबासाठीही धोका निर्माण झाला आहे. या सर्वाची माहिती सर्वांना असली पाहिजे, असेही त्याने सांगितले.

पत्रकार परिषदेत करण मेहरा म्हणाला की. निशा परपुरुषासोबत घरात राहते. तिचं रोहित साटिया याच्यासोबत अफेअर सुरू आहे. तो तिचा मानलेला भाऊ आहे. तो लखनौ येथील राहणारा असून, तो विवाहित आहे. तसेच त्याला एक मुलगी आहे. निशा रोहितसोबत माझ्या घरात राहते ही बाब तिच्या कुटुंबीयांना माहिती आहे. तसेच रोहित हा गेल्या १४ वर्षांपासून निशाकडून राखी बांधून घेतो. एवढंच नाही तर त्याने निशाचं कन्यादानही केलं होतं, असा दावा करण मेहराने केला.

करण पुढे म्हणाला की, गेल्या १४ महिन्यांपासून मी निशाविरोधात पुरावे गोळा करत आहे. तसेच कोर्टामध्ये मी १४०० पानांचे पुरावे दिले आहेत. त्यासोबत ५५ हार्ड एव्हिडन्स आहेत. रोहितची आर्थिक परिस्थिती चांगली नाही आहे, त्यामुळे निशाने माझी प्रॉपर्टी हडप करण्याची योजना आखली आहे. रोहित साटिया याला धुम्रपानाचं व्यसन आहे. तसेच त्याला मद्यपानाचीही सवय आहे. माझा मुलगा कविश हा अशा व्यक्तिसोबत राहत आहे. रोहितचे राजकीय जगताशीही लागेबांधे असून, लखनौ आणि मुंबईतील अनेक नेते त्याच्यासोबत मिळालेले आहेत, असेही करणने सांगितले.

मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. मला नो कॉलर आयडीवरून फोन येतात. याची तक्रार मी पोलिसांकडे केली आहे. निशा रावल आणि रोहित हे गेल्या १४ महिन्यांपासून माझ्या घरात राहत आहेत. माझं सर्व काही त्यांनी ताब्यात घेतलंय. निशा रावल एक अबला स्त्री असल्याचं नाटक करतेय.  फ्लॅट, दोन गाड्या आणि माझा व्यवसाय हडपल्यानंतर ती अबला कशी असू शकते, असा आरोपही करण याने केला आहे.

टॅग्स :करण मेहराबॉलिवूडटेलिव्हिजनगुन्हेगारी