Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री हिना खानला झाला ‘हा’ गंभीर आजार, अभिनेत्रीने सोशल मीडियावर दिली हेल्थ अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 16:24 IST

अभिनेत्री लवकर बरी व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

हिना खान ही एक लोकप्रिय अभिनेत्री असून तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.  हिना खानची काही दिवसांपासून प्रकृती ठीक नव्हती आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, तिला नेमका आजार काय झाला आहे, हे तिनं उघड केलं नव्हतं. आता हिनाने तिच्या तब्येतीविषयी मोठा खुलासा केला आहे. नुकतीच तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, जी पाहून चाहते नाराज झाले आहेत. आता अभिनेत्रीने चाहत्यांना तिच्या तब्येतीबद्दल अपडेट दिली आहे.

हिना खान एका गंभीर आजाराने ग्रस्त आहे. तिनं या आजाराशी संबंधित माहिती शेअर करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. हिना खानने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये हिना खानने हातात खजूर  धरलेला दिसून येत आहे. कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, 'मला गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स डिसीज (GERD) नावाचा आजार झाला आहे.  दुर्दैवाने ही समस्या रमजानमध्ये वाढली आहे. मला उपवासामध्ये अजवा खजूर खाण्याचा सल्ला माझ्या आईनं दिला आहे. ती म्हणाली हे उपयुक्त ठरू शकेल. तर तुमच्याकडेही काही घरगुती उपाय असतील तर तुम्ही मला सुचवू शकता. जेणेकरून मला यातून आराम मिळू शकेल".

हिना खानची ही पोस्ट पाहिल्यानंतर तिचे चाहते काळजीत पडले. अभिनेत्री लवकर बरी व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. सगळे विविध सल्ले देऊ लागले आहेत. हिना खान एक दशकाहून अधिक काळ टीव्ही इंडस्ट्रीचा भाग आहे. या अभिनेत्रीने सकारात्मक ते नकारात्मक अशा सर्व प्रकारच्या भूमिकांनी तिच्या चाहत्यांना भुरळ घातली आहे. हिनाने तिच्या ये रिश्ता क्या कहलाता है या शोमधून लोकप्रियता मिळवली आणि तेव्हापासून तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिच्या फॅशन सेन्सनेही ती लोकांना प्रभावित करते. 

 हिना खान अलीकडेच कंट्री ऑफ ब्लाइंड या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट अमेरिकेत प्रदर्शित झाला आहे. हिना खानच्या कामाचे कौतुक होत आहे. या चित्रपटाला ऑस्कर 2024 मध्ये नामांकन मिळाले आहे. या बातमीने अभिनेत्री खूश आहे. हिना अनेक वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीवर राज्य करत आहे. आता ती चित्रपट आणि ओटीटीवर फोकस करत आहे. ती सोशल मीडियावर एक्टिव्ह असून नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. 

टॅग्स :हिना खानसेलिब्रिटीटेलिव्हिजन