Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर आठ वर्षांनी बाबा झाला टिव्हीवरील हा प्रसिद्ध अभिनेता, मुलीचं नाव ठेवलं 'सिफत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 13:54 IST

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्याने आपल्या मुलीचे नाव सिफत ठेवले आहे.

ठळक मुद्दे पाशमीन लग्नाच्या आठ वर्षांनंतर त्यांच्या घरी पाळणा हलला आहे

इस प्यार को क्या नाम दूँ ? फेम बरुण सोबतीच्या पत्नीने एक गोंडस बाळाला जन्म दिला आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता बरून सोबती आणि त्याची पत्नी पाशमीन लग्नाच्या आठ वर्षांनंतर त्यांच्या घरी पाळणा हलला आहे. बरुणने त्याच्या मुलीचे नाव सिफत ठेवले आहे. सिफतचा अर्थ गुण असा होतो. 

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत बरुण म्हणाला, वडील होण्याची आनंद अद्भभुत आहे. मी माझा आनंद शब्दांमध्ये सांगू शकत नाही. काही दिवसांपूर्वी बरुणने टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील जवळचे मित्रमंडळींना निमंत्रित करून बेबी शॉवरचे आयोजन केले होते. बेबी शॉवर दरम्यानचे पाशमीनचे फोटो सोशल मीडियावर व्हारयल झाले होते. बरुण आणि पाशमीनचा विवाह 2010मध्ये झाले होते. दोघं एकमेकांना शाळेपासून ओळखतात. बरुण आपल्या पर्सनल लाईफला लाईमलाईटपासून दूर ठेवणेच पसंत करतात. 

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, 'इस प्यार को क्या नाम दूँ' या मालिकेच्या तिसऱ्या सिझनमध्ये तो दिसला होता. ही मालिका टिव्हीवर खूप गाजली होती. या मालिकेत त्याची जोडी सान्या इराणीसोबत जमली होती. यात बरुण सोबती अद्वय रायजादा या भूमिकेत प्रेक्षकांना दिसला होता.  

टॅग्स :टिव्ही कलाकार