'बिग बॉस मराठी ६' ची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. या सीझनमध्ये घरात एकापेक्षा एक चांगले स्पर्धक सहभागी आहेत. अशातच 'बिग बॉस मराठी ६'मध्ये चर्चेत असलेला स्पर्धक म्हणजे अभिनेता आयुष संजीव. घरात सुरुवातीपासून चांगला खेळत असलेला आयुष गेल्या काही दिवसांपासून अचानक कमी दिसतोय. इतकंच नव्हे 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात गेल्या दोन दिवसांपासून आयुष जणू गायब झालाय. काय घडलंय नेमकं?
आयुष नक्की आहे कुठे?
'बिग बॉस मराठी ६' मध्ये आयुष सुरुवातीपासून एक स्ट्राँग स्पर्धक होता. पण गेल्या आठवड्यात आयुष आजारी झाला. त्यामुळे बिग बॉसने परवानगी दिल्याने आयुष गेला पूर्ण आठवडा अंथरुणावर झोपून होता. या आठवड्यात आयुष दणक्यात कमबॅक करेल असं वाटलं होतं. परंतु आयुष या आठवड्यात घरातून जणू काही गायब झाला आहे. इतकंच नव्हे बिग बॉस मराठीचे बुधवार - गुरुवारचे एपिसोड पाहिले तर आयुष कुठेच दिसला नाहीये. आयुष घरात आहे की नाही? असा प्रश्न पडावा इतका तो कुठेच सहभागी नाहीये.
यामागचं कारण म्हणजे, आयुष अजूनही आजारी असल्याची शक्यता आहे. आयुषवर घरातच औषधोपचार सुरु असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच तो गेल्या दोन दिवसांपासून 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात कुठेच दिसत नाहीये. आज 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात अनुश्री आणि रोशनमध्ये कॅप्टनसीचा टास्क होणार आहे. त्यात आयुष सहभागी असलेला दिसतोय. त्यामुळे उद्या होणाऱ्या भाऊचा धक्क्यामध्ये आयुषला नक्की काय झालंय, याबद्दल माहिती कळेल. आयुष या आठवड्यात नॉमिनेट आहे. त्यामुळे तो सेफ होतो की घराबाहेर जातो, याकडेही सर्वांचं लक्ष असेल.
Web Summary : Aayush Sanjeev, a strong Bigg Boss Marathi 6 contestant, has been missing from recent episodes. He was ill last week and may still be receiving treatment, explaining his absence. He is nominated this week; his fate hangs in the balance.
Web Summary : बिग बॉस मराठी 6 के मजबूत प्रतियोगी आयुष संजीव हाल के एपिसोड से गायब हैं। पिछली बार वह बीमार थे और संभवतः अभी भी इलाज करा रहे हैं, जिससे उनकी अनुपस्थिति का पता चलता है। इस हफ्ते वह नामांकित हैं; उनकी किस्मत अधर में लटकी है।