Join us
Daily Top 2Weekly Top 5

"दोन अनोळखी मुलींचं नशीब बदलणारी रात्र", नव्या मालिकेचा प्रोमो पाहून अंगावर येईल काटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 10:42 IST

'सुख कळले' नंतर कलर्स मराठीची नवी मालिका, 'अबीर गुलाल'चा प्रोमो पाहा

गेल्या काही दिवसांत अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. नव्या मालिकांचा सपाटाच जणू मराठी चॅनेलने लावला आहे. नुकतीच कलर्स मराठी वाहिनीवर 'सुख कळले' ही नवीकोरी मालिका सुरू झाली आहे. त्यानंतर आता आणखी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. 

कलर्स मराठीच्या या नव्या मालिकेचं नाव 'अबीर गुलाल' असं आहे. या मालिकेच्या प्रोमोमध्ये नुकत्याच जन्मलेल्या २ मुलींची रुग्णालयात अदलाबदल होत असल्याचं दाखविण्यात आलं आहे. एक श्रीमंत घरातील मुलगी तर दुसरी गरीब घराण्यातील असल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे. "दोन अनोळखी मुलींची नशीबं एका रात्रीत बदलली...कोणी अन् का?" असं या मालिकेच्या प्रोमोमध्ये म्हटलं गेलं आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून एक नवी गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

अबीर गुलाल ही मालिका एका कन्नड मालिकेचा रिमेक आहे. 'लक्षणा' या कन्नड मालिकेचा रिमेक असल्याचं म्हटलं जात आहे. या मालिकेची कथाही यावरच आधारित होती. या मालिकेचा हिंदीतही रिमेक झाला आहे. आता मराठीत 'लक्षणा' मालिकेचा रिमेक होत आहे. 

टॅग्स :कलर्स मराठीटिव्ही कलाकार