Join us

टॉपलेस योगा करणाऱ्या या अभिनेत्रीने शेअर केला बॉयफ्रेंडसोबत रोमँटिक वर्कआऊटचा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 19:48 IST

टॉपलेस योगाचा फोटो शेअर केल्यामुळे ही अभिनेत्री आली होती चर्चेत

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री अबिगेल पांडे हिने तिचा बॉयफ्रेंड सनम जोहरसोबत रोमॅण्टिक वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे दोघेही एकमेकांना किस देत वर्कआऊट करताना दिसत आहे.अबिगेल पांडे व सनम जोहर हे गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अबिगेल पांडे ही कायम तिच्या सोशल अकाऊंट्सवरून वर्कआऊटचे व्हिडीओ शेअर करत असते. तिचा बॉयफ्रेंड सनम हा देखील अभिनेता असून तो देखील व्यायामाच्या बाबतीत पॅशनेट आहे. अबिगेल व त्याचा हेडस्टँड करतानाचा व्हिडीओ असून त्यात ते एकमेकांना किस करत आहेत. हा व्हिडिओला खूप लाइक्स मिळत आहेत. अबिगेल हिने काही दिवसांपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून टॉपलेस फोटो शेअर केला होता. या फोटोत ती योगा करत होती.

'न्यूड आणि योगा यामध्ये काहीही समानता नाही. परंतु जी लोकं नवनवीन प्रयत्न करतात त्यांची वेगळी दुनिया असू शकते. हा फोटो क्लिक करण्यापूर्वी मला लाज आणि भितीही वाटत होती, परंतु यामुळे मला स्वतंत्र झाल्यासारखे वाटले. तसेच मला लोक काय विचार करतील याची भिती वाटत होती. परंतु माझे मित्र आशका गोराडिया, फोटोग्राफार आणि माझ्या सुरक्षारक्षकानेव मला हिम्मत दिली. लोक काय करतील याचा तू विचार करू नकोस असा सल्ला त्यांनी मला दिला. त्या एका क्षणात मी सर्व काही विसरले. मला माहिती होते माझ्याशिवाय मला कोणीही पाहात नाहीये. त्या एका क्षणासाठी मला सर्वकाही विसरायचे होते, ही माझी कथा आहे, तुमची काय आहे? असा सवालही अबिगेल हिने चाहत्यांना विचारला आहे.

टॅग्स :टेलिव्हिजन