Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 17 : टीव्हीवरील एक्स कपल 'बिग बॉस’च्या घरात लॉक; पुन्हा दोघांमध्ये फुलणार का प्रेम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 00:14 IST

टीव्हीवरील एक्स कपल म्हणून चर्चेत असलेले अभिनेत्री ईशा मालवीय आणि अभिषेक कुमार बिग बॉस’च्या घरात लॉक झाले आहेत. 

टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिॲलिटी शो ‘बिग बॉस’चा 17 वा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. बिग बॉसच्या घरात यायचं असेल तर कॉन्ट्रोव्हर्सी ही हवीच. टीव्हीवरील एक्स कपल म्हणून चर्चेत असलेले अभिनेत्री ईशा मालवीय आणि अभिषेक कुमार बिग बॉस’च्या घरात लॉक झाले आहेत. 

 ईशा आणि अभिषेक 'उडारियां' या मालिकेमध्ये मध्ये होते आणि दोघांचं बाँडिंगही खूपच चांगलं होतं. शूटिंगदरम्यान ते एकत्र वेळ घालवत असत. मात्र, आता दोघांमध्ये सर्व काही ठिक नसल्याचं दिसून आलं. बिग बॉसच्या घरात लॉक झाल्यानंतर आता त्यांच्यात प्रेम फुलणार की नाही, हे प्रेक्षकांना लवकरच कळेल. 

ईशा मालवीयाचा जन्म 2 नोव्हेंबर 1997 रोजी मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथे झाला. हे तिचे मूळ गावही आहे. येथूनच तिने शालेय शिक्षण पूर्ण केले होते. जेव्हा ईशा मालवीय 13 वर्षांची होती, तेव्हाच तिने मॉडेलिंगमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली होती. ईशा सोशल मीडियावरही सक्रिय असते. ईशा मालवीयाने एका मुलाखतीत सांगितले होतं की, तिनं कधीही अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिलं नव्हतं. तिला पायलट व्हायचं होतं.

बिग बॉसचा हा सीझन खूपच मजेशीर असणार आहे. 'दिल-दिमाग और दम' अशी तिन घरं बिग बॉसमध्ये आहेत. 'बिग बॉस'चं घर हे कला दिग्दर्शक ओमंग कुमार आणि वनिता गरुड यांनी हे डिझाइन केलं आहे. शिवाय, यंदाची थीम ही कपल विरुद्ध सिंगल अशी असणार आहे. काही कपल्स आणि काही सिंगल स्पर्धक बिग बॉस-17 मध्ये आहेत.  हा शो 4 महिने चालणार आहे.  पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या आणि स्पर्धकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी बिग बॉस सज्ज आहे. 

टॅग्स :बिग बॉससलमान खानबॉलिवूड