Join us
Daily Top 2Weekly Top 5

'अग्गंबाई सासूबाई' अभिजित राजे आसावरीला देणार प्रेमाची कबुली ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 07:30 IST

'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेला पाहता पाहता प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं.

'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेला पाहता पाहता प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. मालिकेचं नाविन्य, त्याची आगळी-वेगळी कथा, मालिकेचं वेगळं टेकिंग, निवेदिता सराफ-गिरीश ओक ही जोडी, इत्यादी. या सगळ्यामुळे मालिकेने अल्पशा कालावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली आहे. या सगळ्यामुळे ही मालिका अल्पशा कालावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतेय. हि मालिका आता एका अतिशय विलक्षण वळणावर आली आहे.

अभिजित राजे आणि आसावरी यांच्यातील मैत्रीच नातं दिवसेंदिवस दृढ होतंय. अभिजित आसावरीवर कुठलंही संकट येऊ नये म्हणून नेहमीच तत्पर असतो. त्याच्या मनातील असावारीसाठी असलेल्या भावना अभिजित तिच्या समोर व्यक्त करण्यासाठी अभिजित योग्य वेळेची वाट बघतोय. आगामी भागात अभिजित राजे आसावरीला त्याच्या प्रेमाची कबुली देणार आहे. अभिजितने आसावरीसमोर आपलं प्रेम व्यक्त केल्यावर आसावरीची प्रतिक्रिया काय असेल? शुभ्रा या सगळ्यात सासूबाईंना कशी मदत करणार? सोहम आणि आजोबांची काय प्रतिक्रिया असेल? हे येणाऱ्या काही भागात प्रेक्षणानं पाहता येणार आहे.  

टॅग्स :अग्गंबाई सासूबाई