Join us
Daily Top 2Weekly Top 5

Operation Sindoor : "अब मिट्टी में मिल जाओगे...", भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'चं देवोलिनानं केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 09:23 IST

Devoleena Bhattacharjee : भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ ठिकाणे हवाई हल्ल्यांनी उद्ध्वस्त केली. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला भारताने हवाई हल्ल्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. या हवाई हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले. या कारवाईवर अभिनेत्री देवोलिनी भट्टाचार्जीने प्रतिक्रिया दिली आहे.

भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ ठिकाणे हवाई हल्ल्यांनी उद्ध्वस्त केली. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला भारताने हवाई हल्ल्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. या हवाई हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) असे नाव देण्यात आले. या कारवाईवर अभिनेत्री देवोलिनी भट्टाचार्जी(Devoleena Bhattacharjee)ने प्रतिक्रिया दिली आहे. 

साथ निभाना साथिया फेम अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूरची प्रेस रिलीज आणि भारताच्या तिरंग्याच्या फोटो शेअर करत लिहिले की, धर्माबद्दल विचारल्यानंतर तुम्ही गोळीबार केला, आता तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल. तुम्ही भारताच्या आत्म्यावर हल्ला केला, आता तुम्ही मातीत मिसळून जाल. जय हिंद. जय भारत. जय हिंद की सेना. भारताने ऑपरेशन सिंदूरसह पाकिस्तानाला चोख प्रत्युत्तर दिलं.

२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता. हे सर्व लोक वेगवेगळ्या ठिकाणांहून पहलगामला भेट देण्यासाठी आले होते. आता भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून या हल्ल्याचा बदला घेतला आहे आणि पाकिस्तान आणि पीओकेवर हवाई हल्ले केले आहेत. 

टॅग्स :देवोलिना भट्टाचार्जीऑपरेशन सिंदूर