Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या ६ वर्षानंतर टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पतीने दाखवली बाळाची पहिली झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 08:55 IST

अभिनेत्री आणि तिच्या पतीवर सेलिब्रेटींसह चाहत्यानींही अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री आशका गोराडिया आई झाली आहे. तिच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तिच्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांमुळे चर्चेत होती. आशका गोराडियाने  27 ऑक्टोबर रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. ही आनंदाची बातमी अभिनेत्री आणि तिच्या पतीने चाहत्यांसोबत शेअर केली आहे.  

अभिनेत्री आशका गोराडियाचा पती ब्रेंट ग्लोबल  याने इन्स्टाग्रामवर सर्वांना ही आनंदाची बातमी दिली आहे. यासोबतच त्यांनी आपल्या बाळाची पहिली झळक दाखवली आहे. फोटोत आशका आणि तिच्या पतीच्या हातावर मुलाचा हात दिसतोय. हा फोटो शेअर करताना ब्रेंटने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आज सकाळी 7:45 वाजता विल्यम अलेक्झांडर या जगात आला. मी या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहत होतो. आजपसून मी या जगातून जाईपर्यंत अॅलेक्सचा बाबा असेन.

आशका आणि ब्रेंट गोबलने इन्स्टाग्राम अकाउंटवर ही माहिती देताच, चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी त्यावर प्रेमाचा वर्षाव करत अभिनंदन केलं आहे. मौनी रॉयने लिहिले, 'मावशी तुला पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही, माझ्या भाच्याला खूप प्रेम आणि आशीर्वाद', स्मृती इराणी यांनीही दोघांचं अभिनंदन केलंय.  कनिका माहेश्वरीने लिहिले, 'अभिनंदन.

आशका गोराडिया आणि ब्रेंट ग्लोब यांनी 1 डिसेंबर 2017 रोजी लग्न केले. लग्नाच्या 6 वर्षांनंतर हे कपल आई-वडील झाले आहेत. 

टॅग्स :टिव्ही कलाकार