Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजीदा शेखसोबत झालेल्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलला आमिर अली, म्हणाला,माझ्या आयुष्यातील...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 10:10 IST

आमिर आणि संजीदा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कपलपैकी एक होते. दोघांच्या घटस्फोटाची बातमी ऐकून चाहत्यांना धक्का बसला होता.

अभिनेता आमिर अली 'क्या दिल में है' या मालिकेतून घराघरात पोहोचला. यानंतर तो अनेक जाहिरातींमध्ये दिसला.  'नच बलिये 3' या डान्स रिअॅलिटी शोचा तो विजेता आहे. आमिरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यानं अनेक वर्षे डेट केल्यानंतर 2012 मध्ये त्याची सह-अभिनेत्री संजीदा शेखसोबत लग्न केले. मात्र, नऊ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर दोघे वेगळे झाले आणि 2021 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. दोघांना एक मुलगी असून, तिची कस्टडी संजीदाकडे आहे.

एका मुलाखतीदरम्यान आमिर अलीने घटस्फोटानंतरच्या आयुष्याबद्दल खुलेपणे बोलला आहे. सध्या आमिर अली त्याच्या आगामी 'द ट्रायल: प्यार, कानून, धोका' या चित्रपटात व्यस्त आहे. मुलाखती दरम्यान अभिनेत्याने माजी पत्नीला दिलेल्या घटस्फोटवर भाष्य केलं आहे. तो म्हणाला की, तो आनंदी वातावरणात आहे आणि त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम वेळ अनुभवत आहे. याशिवाय त्याने अप्रत्यक्षपणे आपल्या माजी पत्नीला तिच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आमिर म्हणाला, “मी सर्वांना शुभेच्छा देतो. मी माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ जगतो आहे.”

बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीदरम्यान आमिरने त्याची माजी पत्नी संजीदा शेखसोबत झालेल्या घटस्फोटाबाबत बोलला आहे. त्याने कबूल केले की त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अशा निर्णयामुळे तो पूर्णपणे हादरला होता कारण त्याने तिच्यासोबत नऊ वर्षांपेक्षा जास्तकाळ दोघे एकत्र होते. 

संजीदा शेखने 'क्या होगा निम्मो का' या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ती आज अनेक वर्षं छोट्या पडद्यावर काम करत आहे. ती गेल्या काही वर्षांत 'जाने पहचाने से अजनबी', 'एक हसिना थी' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये झळकली आहे. 

टॅग्स :आमिर अलीसंजीदा शेख