Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आई कुठे काय करते' मालिकेची सांगता, यशची भावुक पोस्ट; म्हणाला, "निरोप घेताना मी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 16:14 IST

अरुंधतीच्या मुलाची भूमिका साकारणारा अभिनेता अभिषेकची देशमुखची भावुक पोस्ट

गेल्या काही वर्षात 'स्टार प्रवाह' वर अतिशय गाजलेली मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते'. या मालिकेला कमालीचं यश मिळालं. पाच वर्ष चाललेली ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. जसे प्रेक्षक मालिकेशी जोडले गेले होते तसंच मालिकेतील कलाकार एकमेकांश, त्या जागेशी जोडले होते. आता हे सर्व सोडून जाताना शेवटच्या दिवशी प्रत्येक कलाकार भावुक झाला. मालिकेतील यश ची भूमिका साकारणारा अभिनेता अभिषेक देशमुखने इन्स्टाग्रामवर भावुक पोस्ट लिहिली आहे.

'आई कुठे काय करते' मालिकेत 'समृद्धी' हा बंगला दाखवण्यात आला आहे. घरासमोरचा फोटो शेअर करत अभिषेकने लिहिले, "Good bye यश अरूंधती देशमुख..आई कुठे..च्या Shooting चा शेवटचा दिवस..2019-2024..1491 episodes..PACK UP! ऐकलं आणि आत खोलवर काहीतरी झालं. ५ वर्षांपासून सोबत असलेलं 'कुणीतरी' आता कधीच नसेल किंवा असेल ह्यातली घालमेल घरी येईपर्यंत होती. निघताना भेटीगाठी झाल्या,आठवणी निघाल्या तरी जरासं अस्वस्थ वाटत होतं. कुणाला तरी भेटायचं राहिलंय असं वाटतच होतं. शांतपणे प्रत्येक खोलीत जाऊन आलो, मेकअप रूममधे,आरशात बघून आलो..पहिल्यांदाच पायऱ्या सावकाश उतरलो. बॅग जराशी जड वाटत होती..निरोप घेताना ‘मी’ समृद्धी बंगल्याकडे बघत होतो की ‘तो’माझ्याकडे बघत होता कुणास ठाऊक!! त्याच्याकडे पाठ करून निघावसं वाटत नव्हतं.."

तो पुढे लिहितो, “मालिका सुरू झाली म्हणजे कधीतरी संपणार..त्यात काय एवढं? ते फक्त काम आहे..” असं शहाण्यांना वाटत असेल..पण मला ते तितकं सोपं नाही वाटलं..! ‘यश’ने मला भरभरून प्रेम दिलं..ओळख दिली..अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही भेटलं तरी त्यांच्या डोळ्यातली चमक,आपलेपणा,आशिर्वाद उर्जा देणारे होते..TV ह्या माध्यमाची ताकद काय असू शकते ह्याची जाणीव करून देणारे अनेक प्रसंग होते..आईच्या भोवती फिरणारं यश चं वर्तुळ अखेर पुर्ण झालं पण ते पुन्हा पुन्हा गिरवलं जाईल ह्याची खात्री आहे कारण आई मुलाचं/मुलीचं नातं वैश्विक असतं."

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकामराठी अभिनेतासोशल मीडिया