Join us

'या' कारणासाठी मधुराणीने नाकारली होती अरुंधतीची भूमिका; मालिकेसाठी दिला होता नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 11:49 IST

Aai kuthe kay karte: 'आई कुठे काय करते'च्या अरुंधतीच्या भूमिकेसाठी मधुराणीने दिला होता नकार; कारण...

छोट्या पडद्यावर गाजलेली मालिका म्हणजे आई कुठे काय करते( aai kuthe kay karte). ही मालिका सुरु झाल्यापासून टीआरपीमध्ये अव्वल स्थानावर आहे. आतापर्यंत या मालिकेत देशमुखांच्या कुटुंबात अनेक चढउतार आले. त्यामुळे दिवसेंदिवस या मालिकेची लोकप्रियता वाढत आहे. या मालिकेत अरुंधती ही मध्यवर्ती भूमिका असून अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) ती साकारत आहे. विशेष म्हणजे या भूमिकेमुळे मधुराणी विशेष प्रकाशझोतात आली. मात्र, सुरुवातीला मधुराणीने या भूमिकेसाठी नकार दिला होता.

या कारणामुळे मधुराणीने दिला होता मालिकेस नकार

मधुराणी या मालिकेमुळे घराघरात पोहोचली. विशेष म्हणजे बऱ्याच काळानंतर तिने मालिकाविश्वात पदार्पण केलं. त्यामुळे तिच्यासाठी ही मालिका खूप खास होती. मात्र, त्यासाठी तिने सुरुवातीला नकार दिला होता. केवळ पतीच्या सांगण्यामुळे तिने ही मालिका स्वीकारली.

मधुराणीची मुलगी लहान आहे. त्यामुळे शुटिंगच्या धावपळीमध्ये लेकीकडे दुर्लक्ष होऊ नये, तिची गैरसोय होऊ नये यासाठी मधुराणीने आई कुठे काय करतेला नकार दिला होता. परंतु, ज्यावेळी मधुराणीने या मालिकेसाठी नकार दिल्याचं तिच्या नवऱ्याला प्रमोद यांना कळलं त्यावेळी त्यांनी तिची समजूत घातली. तसंच लेकीची काळजी करु नकोस. मी आहे तिची काळजी घ्यायला, असं प्रमोदने मधुराणीला आश्वासन दिलं.  त्यानंतर तिने या मालिकेसाठी होकार दिला.

दरम्यान, मधुराणी उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक गायिका, संगीतकारही आहे.  आजवरच्या कारकिर्दीमध्ये तिने अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमा आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. 2003 मध्ये 'इंद्रधनुष्य' या मालिकेच्या माध्यमातून तिने करिअरची सुरुवात केली. 'गोडगुपित' या सिनेमाची निर्मितीदेखील माधुरीने केली आहे. तसंच तिने लेकरु, नवरा माझा नवसाचा, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, सुंदर माझे घर, मणी मंगळसूत्र,  आरोहन या सिनेमांत काम केलं आहे. 

टॅग्स :मधुराणी प्रभुलकरआई कुठे काय करते मालिकाटेलिव्हिजनसेलिब्रिटी