Join us

अरुंधती आणि संजना नव्या भूमिकेत; कोणाला पेलवेल नवी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 18:54 IST

Aai kuthe kay karte: दोघींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये कमालीचा बदल झाला आहे. त्यातच आता या दोघी नव्या भूमिकांसाठी सज्ज झाल्या आहेत.

ठळक मुद्देएकेकाळी गृहिणी असलेली अरुंधती वर्किंग वूमन होणार आहे. तर, वर्किंग वूमन असलेली संजना आता घरसंसार सांभाळणार आहे.

छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' ही मालिका सध्या रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. अनिरुद्धपासून विभक्त झाल्यानंतर अरुंधतीचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. कोणताही निर्णय ती ठामपणे घेताना दिसत आहे. तर, एकेकाळी आपल्याच धुंदीत असलेली संजना घरातल्यांचा, कुटुंबाचा विचार करु लागली आहे. त्यामुळे या दोघींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये कमालीचा बदल झाला आहे. त्यातच आता या दोघी नव्या भूमिकांसाठी सज्ज झाल्या आहेत. परंतु, या नव्या भूमिका या दोघींनाही पेलवतील की नाही हे पाहणं प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचं ठरत आहे.

'आई कुठे काय करते' या मालिकेत सध्या अनेक घटना घडत आहेत. संजना आता कायदेशीर पद्धतीने अनिरुद्धची पत्नी आणि देशमुखांची सून झाल्यामुळे तिच्यावर घरची जबाबदारी पडली आहे. घर आणि नोकरी या दोन्ही गोष्टी सांभाळत असताना तिची नोकरी तिच्या हातून जाणार आहे. तर, घटस्फोटानंतर अरुंधती तिच्या पायावर उभी राहिली असून लवकरच तिला नवी नोकरी मिळणार आहे. 

Anvita Phaltankar :चिंब पावसानं रानं झालं...! लिंबू कलरच्या ड्रेसमध्ये स्वीटूने केलं पावसात फोटोशूट

दरम्यान, एकेकाळी गृहिणी असलेली अरुंधती वर्किंग वूमन होणार आहे. तर, वर्किंग वूमन असलेली संजना आता घरसंसार सांभाळणार आहे. त्यामुळे या दोघी त्यांच्या नव्या भूमिका कशा पद्धतीने पार पाडतील याकडेच चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. 

टॅग्स :रुपाली भोसलेसेलिब्रिटीटिव्ही कलाकार