Join us

Video: अरुंधतीचं लेकीसोबत आहे खास बॉन्डिंग, मधुराणीचा मुलीसोबतचा व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 17:13 IST

अलिकडेच मधुराणीने तिच्या रिअल लाइफ लेकीसोबत एक गोड व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मधुराणी आणि तिच्या लेकीमध्ये स्पेशल बॉन्डिंग दिसून येतंय.

'आई कुठे काय करते'  (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले-प्रभुलकर (madhurani gokhale-prabhulkar). या मालिकेत मधुराणीने अरुंधती ही भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अक्षरश: गारुड घातलं आहे. उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या मधुराणीचा आज तुफान मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम प्रयत्न करत असते. अलिकडेच मधुराणीने तिच्या रिअल लाइफ लेकीसोबत एक गोड व्हिडीओ शेअर केला आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेली मधुराणी अनेकदा तिच्या लेकीसोबतचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. यावेळीदेखील तिने तिच्या मुलीसोबत असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मधुराणी आणि तिच्या लेकीमध्ये स्पेशल बॉन्डिंग दिसून येतंय. चाहते दखील या व्हिडीओचं कौतुक करतायेत.  सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. 

मधुराणीनं या व्हिडिओला कॅप्शन देखील सुंदर दिलं आहे. तिनं म्हटलं आहे की, ती एक मोठी कथाकार आहे..जशी आई तशी मुलगी.. अरुंधती अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम कवयित्री आणि गायिकादेखील आहे. अनेकदा ती तिच्या कविता तिच्या आवाजात सोशल मीडियावर शेअर करत असते.

मधुराणी गोखले ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून जाहिरात क्षेत्रापासून तिने करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर हळूहळू तिचा प्रवास मोठ्या पडद्याकडे झाला. आजवरच्या कारकिर्दीत तिने अनेक मालिका, नाटक, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटिव्ही कलाकार