Join us
Daily Top 2Weekly Top 5

हाताला दुखापत तरीही शेतात राबतेय मराठी अभिनेत्री, व्हिडिओवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 18:26 IST

अश्विनीने कामातून ब्रेक घेत तिचं गाव गाठलं आहे. अश्विनी तिच्या शेतात शेतीची कामं करण्यात मग्न झाली आहे.

'आई कुठे काय करते' ही टीव्हीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मालिकेत अनघाची भूमिका साकारून अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. अश्विनी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स ती चाहत्यांना देत असते. 

सध्या अश्विनीने कामातून ब्रेक घेत तिचं गाव गाठलं आहे. अश्विनी तिच्या शेतात शेतीची कामं करण्यात मग्न झाली आहे. याचा एक व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओत अश्विनी शेतात काम करताना दिसत आहे. ज्वारीची कणसं ती काढताना दिसत आहे. पण, शेतात काम करताना अभिनेत्रीच्या हाताला दुखापत झाल्याचं दिसत आहे. तरीदेखील अश्विनीने काम करणं सोडलेलं नाही. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

दरम्यान, अश्विनीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. 'आई कुठे काय करते' मालिकेत ती अनघाच्या भूमिकेत होती. तिने 'महाराष्ट्र शाहीर', 'बॉईज', 'टपाल' या सिनेमांमध्येही काम केलं आहे. 

टॅग्स :अश्विनी महांगडेटिव्ही कलाकारआई कुठे काय करते मालिका