Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आई कुठे...' फेम रुपाली भोसलेच्या आजीचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 10:45 IST

'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसले हिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रुपालीच्या आजीचं निधन झालं आहे.

'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसले हिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रुपालीच्या आजीचं निधन झालं आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावरुन याबाबत चाहत्यांना ही दु:खद बातमी दिली आहे. रुपालीने इन्स्टाग्रामवरुन आजीबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने आजीचं निधन झाल्याचं सांगितलं आहे. 

रुपालीने फोटो शेअर करत भावुक पोस्ट लिहिली आहे. "आजी 💔🙏🏻🥹 भावपूर्ण श्रद्धांजली! आत्म्यास चिर:शांती लाभो! हीच ईश्वर चरणी प्रार्थना !" असं रुपालीने पोस्टमध्ये म्हटलं आहे. रुपालीच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी कुटुंबाच्या दु:खात सहभागी असल्याचं म्हटलं आहे. तर आई कुठे काय करतेमधील कलाकारांनीही या पोस्टवर कमेंट करत रुपालीला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. 

दरम्यान, रुपाली भोसले ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मालिकांमध्ये काम केलेल्या रुपालीला आई कुठे काय करते या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील संजना हे खलनायिकेचं पात्र साकारून रुपाली प्रसिद्धीझोतात आली. रुपालीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते. 

टॅग्स :रुपाली भोसलेटिव्ही कलाकार