Join us

थाटात पार पडलं राधा सागरच्या लेकाचं बारसं; बाळाचं नाव आहे खूपच खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 11:39 IST

Radha sagar: या बारश्याच्या निमित्ताने राधाने तिच्या बाळाची पहिली झलकही दाखवली आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री राधा सागर (radha sagar) सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. २ महिन्यांपूर्वी राधाने एका गोंडस बाळाला जन्म दिला. राधा प्रेग्नंट असल्यापासून ते तिचं बाळ होईपर्यंत तिच्या प्रत्येक गोष्टीची सोशल मीडियावर चर्चा रंगली. यामध्येच तिच्या बाळाची एक झलक पाहता यावी यासाठी नेटकरी उत्सुक होते. त्यातच राधाच्या बाळाचं बारसं नुकतंच पार पडलं असून तिने तिच्या बाळाचं नाव ठेवलं आहे. इतकंच नाही तर या बारश्याच्या निमित्ताने तिने तिच्या बाळाची झलकही नेटकऱ्यांना दाखवली आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या राधाने तिच्या बाळाच्या बारश्याचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थिती राधाच्या बाळाचं बारसं पार पडलं आहे. विशेष म्हणजे राधाने तिच्या बाळाचं नावही अत्यंत विचारपूर्वक ठेवलं आहे.

या बारश्याच्या निमित्ताने राधा आणि तिच्या बाळाने छान ट्विनिंग केलं होतं. या दोघांनीही जांभळ्या रंगाच्या पैठणीचा ड्रेस परिधान केला होता.  राधाने तिच्या लाडक्या लेकाचं नाव वीर असं ठेवलं आहे. वीर याचा अर्थ होतो साहसी योद्धा.

दरम्यान, राधाने लग्नानंतर १० वर्षांनी आई होण्याचा निर्णय घेतला. राधाने तिला बाळ होण्यापूर्वी काही काळ कलाविश्वातून ब्रेक घेतला होता. इंडस्ट्रीतून ब्रेक घेण्यापूर्वी ती आई कुठे काय करते या मालिकेत झळकली होती. या मालिकेत तिने अंकिता ही भूमिका साकारली होती. 

टॅग्स :टेलिव्हिजनआई कुठे काय करते मालिकासेलिब्रिटी